पुणे – क्रीडा स्पर्धामधील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या “वुमेन्सच्या लीग’ योजनेंतर्गत सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने बारामती येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत गुजरातच्या रीया पटेल आणि महाराष्ट्रच्या सांगलीच्या योगेश्वरी कदम आणि अहमदनगरच्या अपूर्वा गोरे यांनी आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आज सकाळी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार यांच्या हस्ते या स्पर्धचे उद्घाटन संपन्न झाले. स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे- सब ज्युनिअर गर्ल्स 10 किमी टायम ट्रायल – सुवर्ण – रीया पटेल (16 मि 19.05 से.), रौप्य – श्रावणी परीट (16 मी. 22.59 से.), कांस्य श्रावणी कासार (17 मी. 22.71 से.); ज्युनिअर गर्ल्स 10 किमी टाईम ट्रायल – अपूर्वा गोरे (15 मि. 52.481) रौप्य – स्नेहल माळी (15 मी. 58.115से.), कांस्य – अंजली पाटील (16 मी 47.132 से); वुुमेन इलीट 20 किमी टाईम ट्रायल – सुवर्ण -योगेश्वरी कदम (34 ता 11.484से), रौप्य – प्रिया दबालीया (34.11 मी. 484 से.), कांस्य – राधिका दराडे (25.06.408).