Pune District : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; सभापतीपदी अशोक राक्षे, उपसभापतीपदी रणजित गाडे
Pune District : यावेळी विजयसिंह शिंदे, विजया शिंदे, सतीश राक्षे, बाबा राक्षे, विद्या मोहिते, दीप्ती भोगाडे आणि हिरामण सातकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराग जैद यांनी केले.

राजगुरुनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक राक्षे, तर उपसभापतीपदी रणजित गाडे यांची मंगळवारी (दि. 28) बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन देशमुख यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर बाजार समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत शहरातून विजयी मिरवणूक काढली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेस निवडणूक निर्णय अधिकारी सचिन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे उपस्थित होते. सभापतीपदासाठी अशोक राक्षे, तर उपसभापतीपदासाठी रणजित गाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अन्य कोणताही अर्ज न आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या वेळी मावळते सभापती तथा संचालक विजयसिंह शिंदे, क्रांती सोमवंशी, जयसिंग भोगाडे, कैलास लिंभोरे, अनुराग जैद, सोमनाथ मुंगसे, हनुमंत कड, विठ्ठल वनघरे, कमलताई कड, सागर मुर्हे, माणिक गोरे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे आणि सुधीर भोमाळे हे संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर झालेल्या जाहीर सभेला आमदार बाबाजी काळे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, माजी अध्यक्ष किरण आहेर, अॅड. राहुल तांबे पाटील, विजया शिंदे, विद्या राक्षे, दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, बाबा राक्षे, जितेंद्र राक्षे, मृगेश काळे, मंगेश सावंत, सतीश राक्षे, हिरामण सातकर, सुभाष होले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी विजयसिंह शिंदे, विजया शिंदे, सतीश राक्षे, बाबा राक्षे, विद्या मोहिते, दीप्ती भोगाडे आणि हिरामण सातकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराग जैद यांनी केले.
बाजार समितीतील परिवर्तनाचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरही झाला. संचालकांनी तालुक्यातील दहशतीचे राजकारण मोडून काढले. शेतकर्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या माध्यमातून उत्तम काम होत असून, आमदार म्हणून सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. बाजार समितीत अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
-बाबाजी काळे, आमदार, खेड-आळंदी
कोणी काहीही केले तरी ईश्वर माझ्या सोबत आहे. सत्यमेव जयते हा आमचा विश्वास आहे. बाजार समितीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक ठेवत सर्वांना सोबत घेऊन शेतकरीहिताचे निर्णय घेतले जातील.
-अशोक राक्षे, नवनियुक्त सभापतीही शेतकर्यांची संस्था असून गट-तट बाजूला ठेवून काम करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गावागावांतून निवडून आलेले संचालक येथे शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करतात. स्वच्छ प्रतिमेचा कारभार करण्याचा प्रयत्न राहील.
-रणजित गाडे, नवनियुक्त उपसभापतीबाजार समितीचा कारभार पारदर्शक आणि सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. ही शेतकर्यांची संस्था असून आम्ही शेतकर्यांची मुले आहोत. सर्व पक्षांना समान संधी देण्याची भूमिका कायम राहील.
-विजयसिंह शिंदे, मावळते सभापती





