Jamkhed News : खर्ड्यातील तानाजी बोराडे हत्याकांडाचा ४८ तासांत छडा; पुणे अन् राहुरीतून चौघांना ताब्यात
Jamkhed News : दूध व्यावसायिक तानाजी भास्कर बोराडे यांच्या निर्घृण हत्याकांडाचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे.

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ दूध व्यावसायिक तानाजी भास्कर बोराडे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे. (Jamkhed News)
पुणे आणि राहुरी परिसरात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका सज्ञान आरोपीसह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Jamkhed News)
शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास तानाजी भास्कर बोराडे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) हे नेहमीप्रमाणे माळेवाडी परिसरातून कैलास आल्हाट यांच्या पिकअप वाहनातून दूध संकलित करून खर्ड्याकडे आले होते. दूध घातल्यानंतर संशयितांनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. (Jamkhed News)
बोराडे तेथे पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर डोक्यात आणि मानेवर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खर्डा शहरासह जामखेड तालुक्यात खळबळ उडाली होती. (Jamkhed News)
या प्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Jamkhed News)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. (Jamkhed News)
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य संशयित पुणे शहरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने पुण्यात कारवाई करत एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. (Jamkhed News)
यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथून प्रसाद अशोक अडगळे (वय १८, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) याच्यासह १६ आणि १७ वर्षांच्या आणखी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. (Jamkhed News)
ताब्यात घेण्यात आलेल्या एका सज्ञान आरोपीसह तीन विधीसंघर्षित बालकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खर्डा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा अत्तार, अरुण मोरे, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाचा सहभाग होता. (Jamkhed News)
दरम्यान, तानाजी बोराडे यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, हत्येचा कट कसा रचण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास खर्डा पोलिसांकडून सुरू आहे. (Jamkhed News)





