Khadakwasla Dam: पुणेकरांनो सतर्क राहा ! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे – आज (दि. 24) खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणातून दुपारी ४ वा. मुठा नदी पात्रात १९ हजार ११८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि खबरदारी घ्यावी असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाने तुफान हजेरी लावली आहे.





