Ketan Agrawal Murder Case : केतन हत्याकांडात नवा ट्विस्ट! सिया-चेतनच्या कटात आणखी एकाचा सहभाग? भावाची पोलिसांकडून चौकशी
Ketan Agrawal Murder Case : लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.

Ketan Agrawal Murder Case : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडात आता आणखी एका व्यक्तीच्या संभाव्य सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मयत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल यालाही या कटाची माहिती असावी, असा संशय व्यक्त केला असून त्यानंतर पोलिसांनी साहिलची चौकशी सुरू केली आहे. (Ketan Agrawal Murder Case)
विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली असून सरकारने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Ketan Agrawal Murder Case)
साहिललाही कटाची माहिती होती?
विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलचा भाऊ साहिल आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी हे जवळचे मित्र होते. त्यामुळे केतनच्या हत्येचा कट फक्त सिया आणि चेतनपुरता मर्यादित नसून आणखी काही जणांना त्याची माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी साहिल गोयलला चौकशीसाठी बोलावून त्याचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. (Ketan Agrawal Murder Case)
‘विग हे हत्येचं कारण असू शकत नाही’
दरम्यान, सियाने चौकशीत केतन विग वापरत असल्यामुळे तो आवडत नव्हता, असे सांगितल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना विशाल अग्रवाल म्हणाले की, केतन डोक्यावर हेअर पॅच (विग) वापरत असल्याची माहिती लग्न ठरण्यापूर्वीच सिया आणि तिच्या कुटुंबाला देण्यात आली होती. त्यामुळे ही बाब हत्येचे कारण ठरू शकत नाही. (Ketan Agrawal Murder Case)
तपासाची व्याप्ती वाढली
१८ जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या झाल्याचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Ketan Agrawal Murder Case)
Ketan Agrawal death case : मोबाईलमुळे उलगडला नवा धागा; प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री






