Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? ‘या’ खासदारांना मिळेल मंत्रिपद; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
Cabinet Reshuffle : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच व्यापक फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cabinet Reshuffle : केंद्रातील मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी किंवा सोमवारी हा फेरबदल होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Cabinet Reshuffle)
या पार्श्वभूमीवर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही विद्यमान मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याचीही शक्यता आहे. (Cabinet Reshuffle)
‘या’ नेत्यांना मिळू शकते मंत्रिपद
संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात काही महत्त्वाच्या नावांची चर्चा सुरू आहे. माजी आरबीआय गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. (Cabinet Reshuffle)
महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत असून, शिवसेना (ठाकरे गट) सोडून आलेल्या खासदारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले संजय दिना पाटील यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. (Cabinet Reshuffle)
याशिवाय अनुराग ठाकूर, अरुण गोविल, विष्णूदत्त शर्मा, तरुण चुघ, जनार्दन सिंग सिग्रीवाल तसेच राघव चढ्ढा किंवा अशोक मित्तल यांपैकी एखाद्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका मिळू शकते, अशीही चर्चा आहे. (Cabinet Reshuffle)
या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता
संभाव्य फेरबदलात काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थ मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. (Cabinet Reshuffle)
तर मनोहर लाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा मंत्रालय दुसऱ्या मंत्र्याकडे दिले जाऊ शकते. मात्र नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे. (Cabinet Reshuffle)
‘या’ मंत्र्यांवर डच्चूची चर्चा
फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांची नावे चर्चेत आहेत. (Cabinet Reshuffle)
विशेषतः रवनीत सिंग बिट्टू यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आल्याने आणि त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. याशिवाय आणखी काही राज्यमंत्र्यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Cabinet Reshuffle)
PM Modi : मोठी घडामोड..! केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ






