Omraje Nimbalkar : मोठी बातमी..! ओमराजेंच्या विरोधात भावानेच थोपटले दंड? धाराशिवमध्ये मकरंदराजेंना उद्धव ठाकरे देणार ताकद?
Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक भूमिका घेतली आहे

Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंड करून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते चार दिवसांच्या दौऱ्यावर असून 28 जून रोजी धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. (Omraje Nimbalkar)
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची अधिकृत सुरुवात 26 जूनपासून होत असून ते यवतमाळ-वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांना भेट देणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणे हा असल्याचे सांगितले जात आहे. (Omraje Nimbalkar)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
धाराशिवमध्ये जोरदार तयारी
28 जून रोजी धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांनी उमरगा आणि तुळजापूर मतदारसंघात बैठका घेऊन शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Omraje Nimbalkar)
मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मकरंदराजे यांनी सांगितले की, “महिनाभरापूर्वी ओमराजेंनी पक्षांतराबाबत माझ्याशी चर्चा केली होती. मी त्यांना निर्णय बदलण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. पक्षाने आदेश दिल्यास गरज पडल्यास मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार आहे.” या भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राजकारण करणाऱ्या दोन भावांच्या राजकीय वाटा आता पूर्णपणे वेगळ्या झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Omraje Nimbalkar)
संघटना मजबूत करण्यावर भर
धाराशिव दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून बंडानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत. बंडखोर खासदारांनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची ताकद आणि जनाधार आपल्या बाजूने कायम असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त केला जात आहे. (Omraje Nimbalkar)
मात्र, उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यात कोणाला निवडणुकीसाठी पाठिंबा देणार किंवा ओमराजे निंबाळकरांविरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या दौऱ्यातील त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Omraje Nimbalkar)
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर! शिवसेनेत प्रवेश करताच ओमराजेंना पहिला मोठा धक्का






