Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन; हत्येचा कट रचणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Ketan Agarwal : पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Ketan Agarwal : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून, त्यामुळे हत्याकांडातील आरोपींची संख्या तीन झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रितेश हिंगे असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याचं समोर आलं आहे. (Ketan Agarwal)
हत्येच्या कटाची आधीच माहिती होती?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटाची रितेशला आधीपासून माहिती होती का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. (Ketan Agarwal)
चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांनी रितेशसोबत केतनच्या हत्येबाबत चर्चा केल्याचा पोलिसांना संशय आहे. केतनची हत्या कशा पद्धतीने करायची, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे. (Ketan Agarwal)
सिया आणि चेतन यांनी रितेशला लोहगडला सोबत येण्यासाठी वारंवार आग्रह केला होता. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. (Ketan Agarwal)
चेतनच्या फोनमधून रितेशपर्यंत पोहोचले पोलीस
केतनच्या हत्येनंतर चेतन चौधरीने रितेशची भेट घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच सिया गोयलदेखील रितेशच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. चेतन चौधरीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेशचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. (Ketan Agarwal)
बीडचा रहिवासी, बालेवाडीत नोकरी
अटक करण्यात आलेला रितेश हिंगे हा बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. तो सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याचं समोर आलं आहे. (Ketan Agarwal)
पोलिसांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रितेश चेतन चौधरीच्या संपर्कात होता. त्यामुळे हत्येच्या कटाबाबत त्याला नेमकी किती माहिती होती आणि या संपूर्ण प्रकरणात त्याची भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. (Ketan Agarwal)
तपासाला नवं वळण
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर नेमका काय घटनाक्रम घडला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हत्येच्या कटाची माहिती कोणाला होती, कोणाचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि कोणाला या कटाची कल्पनाच नव्हती, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे. (Ketan Agarwal)
दरम्यान, तिसऱ्या आरोपीच्या अटकेमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ketan Agarwal)
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट! सियाचा नवा कारनामा समोर; पोलिसही चक्रावले






