Mumbai News : मुंबईत दहीहंडीवेळी 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; मन हेलावणारी घटना
Mumbai News : उत्सवाचा आनंद सुरू असतानाच मालाडच्या मालवणी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे.

Mumbai News : मालाडच्या मालवणी रोडवरील एकता वेल्फेअर सोसायटीत मन हेलावणारी घटना घडली असून, मालवणी येथे दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भिंतीचा कॉलम कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. (Mumbai News)
माहितीनुसार, चिकुवाडी, मालवणी, मार्वे रोड येथील एकता वेल्फेअर सोसायटीतील रूम क्रमांक 23 जवळ स्थानिक पातळीवर दहीहंडीचा उत्सव सुरू होता. काही मुले दहीहंडी फोडत होती, यासाठी दोरी एका झाडाला तसेच तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती. (Mumbai News)
दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान अचानक विटांचा कॉलम कोसळला आणि त्याखाली 7 वर्षीय रुद्र कदम हा मुलगा अडकला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर रुद्रला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. (Mumbai News)
मात्र, डॉक्टरांनी रुद्रला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कंट्रोल रूम, पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. उत्सवादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Mumbai News)
Mumbai News : नवी मुंबईत तब्बल ‘इतक्या’ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ६ जणांना अटक





