Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट! सियाचा नवा कारनामा समोर; पोलिसही चक्रावले
ण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि कोट्यधीश तरुण केतन अग्रवाल (Ketan Agarwal Case) याच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने केतनचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Ketan Agarwal Case : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि कोट्यधीश तरुण केतन अग्रवाल (Ketan Agarwal Case) याच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने केतनचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याचा खून केला होता.
पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पोलीस चौकशीत (Ketan Agarwal Case) आता आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा खुलासा समोर आला आहे. केतनला लोहगडावरून ढकलण्यापूर्वी सिया आणि चेतनने त्याला मारण्यासाठी एक भयंकर प्लॅन आखला होता.
केतनला ‘स्लो पॉयझन’ देऊन अपंग करण्याचा होता डाव
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचे लग्न ठरल्यानंतरच सियाने प्रियकर चेतनसोबत मिळून केतनचा गेम वाजवण्याची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला त्यांनी केतनला थेट मारण्याऐवजी त्याला जेवणातून किंवा अन्य माध्यमातून (Ketan Agarwal Case) ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू पसरणारे विष) देण्याचा कट रचला होता.
केतनला कायमचे अपंग करणे किंवा संशयास्पद मृत्यूच्या खाईत लोटणे हा यामागचा मुख्य हेतू होता. सियाने या कटाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही केला होता; मात्र वेळेवर विष उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा हा पहिला डाव फसला. हा डाव फसल्यानंतरच त्यांनी केतनला लोहगडावर नेऊन तिथून दरीत ढकलण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला.
पोलीस चौकशी टाळण्यासाठी जपानी व्हिडिओवरून घेतली ‘ट्रेनिंग’
या प्रकरणातील दुसरा धक्कादायक खुलासा म्हणजे आरोपींचे क्रूर आणि नियोजनबद्ध अद्यावत मनसुबे. केतनचा खून केल्यानंतर पोलिसांचा संशय आपल्यावरच येणार, याची सिया आणि चेतनला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे पोलिसांच्या कडक चौकशीतून कसे सुटायचे, यासाठी त्यांनी चक्क एका जपानी व्हिडिओची मदत घेतली होती.
अटकेनंतर पोलिसांनी जेव्हा दोघांच्या मोबाईल आणि लॅपटॉपची वेब हिस्ट्री (Web History) तपासली, तेव्हा त्यांच्या हाती मोठे पुरावे लागले. सिया आणि चेतन यांनी हत्येपूर्वी आणि नंतर तब्बल दोन तासांचा एक जपानी व्हिडिओ पाहिला होता.
पोलिसांच्या थर्ड डिग्री आणि चक्रव्यूहातून कसे सुटायचे, चौकशीदरम्यान स्वतःला शांत कसे ठेवायचे आणि पोलिसांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने खोटी उत्तरे कशी द्यायची, याचे प्रशिक्षण या व्हिडिओमध्ये देण्यात आले होते. पोलिसांनी या व्हिडिओच्या लिंक्स जप्त केल्या आहेत.
तपासाला वेग, न्यायालयात भक्कम पुरावे सादर होणार
‘स्लो पॉयझन’चा कट आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेले व्हिडिओ ट्रेनिंग, या दोन्ही नवीन खुलाश्यांमुळे पोलिसांच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.
आरोपींनी हा खून केवळ रागाच्या भरात केला नसून, तो अतिशय थंड डोक्याने रचलेला एक सुनियोजित कट होता, हे आता सिद्ध होत आहे. हे नवे पुरावे न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच भविष्यात या प्रकरणात (Ketan Agarwal Case) आणखी काही खुलासे होतात का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.




