Satara News : सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा आज जल्लोष; 10 हजार धावपटूंच्या सहभाग, यवतेश्वर घाटात रंगणार थरार
Satara News : देश-विदेशातील धावपटूंचे विशेष आकर्षण ठरलेली ‘पुनित बालन ग्रुप सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२६’ साठी ऐतिहासिक सातारा शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Satara News : देशविदेशातील धावपटूंचे आकर्षण ठरलेल्या पुनित बालन ग्रुप सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 साठी सातारा शहर सज्ज झाले आहे. तब्बल दहा हजार धावपटूंच्या सहभागाने उद्या (दि. ६) सकाळी शहरात मॅरेथॉनचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. (Satara News)
मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 6.30 वाजता धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे. सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित या मॅरेथॉनच्या प्री- रेस एक्स्पोचे उद्घाटन वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. (Satara News)
मुख्य स्पर्धेच्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Satara News)
सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक समितीने मॅरेथॉनची जय्यत तयारी केली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉनने आपल्या दर्जेदार आयोजनासोबतच नैसर्गिक आणि आव्हानात्मक धावमार्गामुळे देश-विदेशातील धावपटूंच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Satara News)
मॅरेथॉनचा प्रारंभ पोलीस कवायत मैदानावरुन होणार असून धावपटू पोवई नाका, शाहू चौक, बोगदा मार्गे यवतेश्वर घाटाकडे मार्गस्थ होतील. यवतेश्वर मंदिराच्या पुढे प्रकृती हिल रिसॉर्टपर्यंत धावल्यानंतर त्याच मार्गाने धावपटू पुन्हा पोलीस कवायत मैदानाकडे परतणार आहेत. (Satara News)
याच मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यवतेश्वरचा घाट आणि निसर्गरम्य परिसरातून धावण्याचा अनुभव देणारी ही मॅरेथॉन पुन्हा एकदा शहराला क्रीडा पर्यटनाच्या नकाशावर झळकवणार आहे. (Satara News)
मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल
मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागानेही विशेष नियोजन केले आहे. रविवारी सकाळच्या सत्रात बोगदा परिसरातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार असून वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Satara News)





