Katrina Kaif : कतरिना कैफ वाढलेल्या वजनावरून ट्रोल; ‘या’ अभिनेत्रीने टीका करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर
Katrina Kaif : शिवालिका ओबेरॉयचे कतरिनाला समर्थन

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफने गेल्या वर्षी आई झाली. मुलगा विहानला जन्म दिल्यानंतर ती लाईमलाईटपासून दूर आहे. प्रेग्नन्सीनंतर ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहत नाही. (Katrina Kaif )
मात्र अलिकडेच ती कुकू कोहली यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला हजर राहिली होती. त्यावेळी कतरिनासह ही तिचा पती, अभिनेता विकी कौशल आणि तिचे सासरेही उपस्थित होते. (Katrina Kaif )
यावेळी कतरिनाचा लुक पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर काही ट्रोलर्सनी तिच्या बदललेल्या लुकवरून असंवेदनशील तसेच कमेंट्स केल्या. (Katrina Kaif )
कतरिनाने यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही, मात्र कतरिनाला ट्रोल करताच टीव्ही अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय हिने टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
शिवालिका ओबेरॉयचे कतरिनाला समर्थन
शिवालिका ओबेरॉयने इंस्टाग्राम स्टोरीजवर कतरिना कैफचा तोच फोटो पोस्ट केला, ज्यावरून तिला ट्रोल केले जात आहे. फोटो पोस्ट करत शिवालिकाने “काय चाललंय नक्की? हे मातृत्व आहे” असं म्हणत टीकाकारांना सुनावलं.
तिने पुढे लिहिलं, ‘नॉर्मल पोस्टपार्टम रिकव्हरी अशीच दिसते. कधी चांगली, कधी वाईट, सूज, थकवा आणि या सगळ्यांच्या मधल्या प्रत्येक गोष्टीसह असते. मातृत्वाचं असं रूप गौरवणं बंद करा, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. गेल्या काही दिवसांत अशा अनेक पोस्ट पाहिल्यानंतर मला वाटतंय की ही मानसिकता किती हास्यास्पद आहे.’
View this post on Instagram
शिवालिका ओबेरॉय नुकतीच आई झाली. काही दिवसांपूर्वीच तिने बाळाचं स्वागत केलं. त्यामुळे गर्भधारणेनंतर शरीरात होणारे बदल ती स्वतःच्या अनुभवातून चांगल्या प्रकारे समजू शकते. एखाद्या अभिनेत्रीला गर्भधारणेनंतर तिच्या बदललेल्या रूपावरून ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनाही अशाच प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा:
Eknath Shinde : मोठी घडामोड! ठाकरेंचे 14 आमदार फुटणार असल्याची चर्चा; आता एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना







