Emraan Hashmi : इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण; बेंगळुरूमधील कार्यक्रम पुढे ढकलला
Emraan Hashmi : बेंगळुरूमधील कार्यक्रमाची नवी तारीख

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. एकीकडे त्याच्या ‘आवारापन 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे, त्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच त्याने H1N1 ची टेस्ट केली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांनी त्याला खबरदारी घेण्याचा, विलगीकरणात राहण्याचा आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
इम्रान हाश्मीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आजारी असल्याचे आणि त्यामुळे बेंगळुरू येथील आपला कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली. मात्र या पोस्टमध्ये त्याने त्याला स्वाइन फ्लू झाल्याचा उल्लेख त्याने केला नव्हता. Emraan Hashmi
बेंगळुरूमधील कार्यक्रमाची नवी तारीख
पोस्टमध्ये इम्रान हाश्मी याने लिहिले आहे की, “नमस्कार बेंगळुरू, माझी प्रकृती खूप खराब आहे आणि दुर्दैवाने, मी बेंगळुरूतील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. पण हा कार्यक्रम रद्द झालेला नाही, तर तो केवळ पुढे ढकलण्यात आला आहे. मी तुम्हाला शनिवारी, 12 सप्टेंबर रोजी ‘सनबर्न युनियन’ येथे भेटेन. तुमची तिकिटे नवीन तारखेसाठी वैध राहतील. मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
दरम्यान, 2007 साली आलेल्या ‘आवारापन’ चा हा सिक्वेल असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सॅकनिल्क’ च्या आकडेवारीनुसार, ‘आवारापन 2’ ने 15 दिवसांत देशभरात 173.30 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जगभरात 205.35 कोटी रुपयांचे ‘ग्रॉस कलेक्शन’ नोंदवले आहे. इम्रान हाश्मी सोबत या सिनेमात दिशा पाटणी मुख्य भूमिकेत आहे. Emraan Hashmi
हेही वाचा:
Nikki Tamboli- Arbaz Patel : निक्की आणि अरबाजचे ब्रेकअप? एकमेकांना केले अनफॉलो







