Katrina Kaif : “तू माझ्या आयुष्यातील….”; कतरिना कैफने शेअर केले मुलासोबतचे खास फोटो
Katrina Kaif : या फोटोंमध्ये तिच्यासोबत पती अभिनेता विकी कौशल आणि मुलगा वियानची झलकही पाहायला मिळत आहे.

Katrina Kaif : नुकताच अभिनेत्री कतरिना कैफने तिचा ४३ वा वाढदिवसा साजरा केला. यानंतर आता तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत पती अभिनेता विकी कौशल आणि मुलगा वियानची झलकही पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, वियानचा चेहरा न दाखवता त्याचे काही गोंडस क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत. १६ जुलै रोजी कतरिनाने तिचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस तिच्यासाठी खास ठरला, कारण मुलगा वियानसोबतचा तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. आता तिने या खास दिवसाच्या आठवणी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन शेअर केल्या आहेत.
या फोटोंमध्ये कतरिना वियानला मांडीवर घेऊन प्रेमाने पोज देताना दिसते. एका फोटो वियान आईचे नाक पकडताना दिसत असून, हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, कतरिनाने अद्याप मुलाचा चेहरा सार्वजनिक केलेला नाही.
या पोस्टसोबत कतरिनाने भावनिक कॅप्शन देत लिहिले ती म्हणते, “तू माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल आशीर्वाद आहेस. देवाने दिलेल्या या सुंदर भेटीसाठी मी कायम आभारी आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वाढदिवस होता आणि त्यामागचे कारण तूच आहेस.”
फोटोंमध्ये कतरिना केशरी आणि निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये विकी कौशलही तिच्यासोबत दिसत असून, त्यांच्या कुटुंबातील हे खास क्षण चाहत्यांच्या मनाला भिडले आहेत. कतरिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.
एका चाहत्याने, “कतरिना, विकी आणि वियानचा हा सुंदर कौटुंबिक क्षण कायम असाच राहो,” अशी शुभेच्छा दिली. तर आणखी एका चाहत्याने, “कतरिनाच्या मातृत्वाचा हा प्रवास खूपच गोड आहे,” असे म्हटले आहे. चाहत्यांसोबतच अभिनेत्री अदिती राव हैदरी, दिया मिर्झा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही कतरिनाच्या पोस्टवर प्रेमळ प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Doctors protest: उद्या हॉस्पिटल्स बंद; राज्यातील डॉक्टरांचा संप





