‘कात्रजचा खून झाला!’, पुण्यात झळकला भलामोठा फ्लेक्स

Updated On:

पुणे -पुण्यातील कात्रज चौकामध्ये एका खाजगी प्लॉटवर अज्ञातांनी ‘कात्रजचा खून झाला!’ असा वीस बाय 50 चा मोठा फ्लेक्स लावला आहे. या  फ्लेक्समुळे  परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या फ्लेक्सची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यां मार्फत हा फ्लेक्स काढण्यात आला आहे.  या प्रकरणी अज्ञात नागरिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनर मुळे कात्रज येथील राजकारण तापत आहे की
काय… किंवा आणखी काही यामागे कारणे आहेत अशा चर्चा सुरू आहे. मात्र या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

मागील आठवड्यामध्ये कात्रज येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  हस्ते झाला.  कदाचित उड्डाणपुलामुळे कात्रज चौकातील अनेक उद्योगधंद्यांवर या उड्डाणपुलामुळे परिणाम पडणार तसेच यामुळे कात्रज परिसरातील उपजीविकेवर परिणाम होतो की काय अशी देखील चर्चा आहे.

तसेच कात्रज कोंढवा रस्त्यावरील जागा संपादन विषय देखील अजून अर्धवट आहे त्यामुळे रस्त्याचे काम देखील संथ गतीने सुरू आहे. या फ्लेक्सचे असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ