Walmik Karad Poster | पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. मात्र दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टरवर “We support Walmik Anna, कराड आमचे दैवत” असा मजकूर झळकत होता. कराड समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील, तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे.” यावर आता पंकजा मुंडे काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Walmik Karad Poster | वाल्मिक कराडला आमदार धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकार म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. यानंतर आता थेट कराडचे पोस्टर दसऱ्या मेळाव्यात झळकले आहेत. Walmik Karad Poster | हेही वाचा: ‘क्रांत्या कधी हुकूमशाहीत बदलतील हे तुम्हालाच कळत नाही’ ; मोहन भागवत यांनी Gen-Z विषयी बोलताना नेपोलियनचे कौतुक