Walmik Karad : कृष्णा आंधळे अद्यापही फरार, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाबाबत कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
Walmik Karad : न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

Walmik Karad : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. याचदरम्यान हा आरोपी आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. हे प्रकरण ताजे असतानाच, आता सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडला झटका दिला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. Walmik Karad :
सुप्रीम कोर्टात जामीनासाठी धाव
वाल्मीक कराडने जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि पुराव्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाला वाल्मीक कराडने (Walmik Karad ) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याने जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण सुप्रीम कोर्टानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.
कृष्णा आंधळे तीनदा गावात
या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत असून तो त्याच्या गावी तीनदा येऊन गेल्याची माहिती पोलिसांना संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी दिली. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन काढणे कठीण जात असल्याचे म्हटले जाते. Walmik Karad :
दरम्यान, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा:






