तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
Updated On:

संगमनेर – तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेरमध्ये निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.
काही दिवसांपूर्वी कांताबाई यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातील काही जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सन 2005 मध्ये तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला.





