Kamala Harris on Donald Trump। व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अत्यंत गुप्त आणि जलद कारवाईत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. या घटनेने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, माजी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही कारवाई ड्रग्ज बंद करण्यासाठी किंवा लोकशाही वाचवण्यासाठी नाही. कमला हॅरिस यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ट्रम्पवर टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, व्हेनेझुएलातील ही कारवाई अमेरिका सुरक्षित किंवा मजबूत करणार नाही. मादुरो हा क्रूर हुकूमशहा असू शकतो, परंतु ट्रम्पचे पाऊल पूर्णपणे बेकायदेशीर आणि अविचारी आहे. हॅरिसने यांनी यावेळी, “राजवट बदलण्यासाठी किंवा तेलासाठी लढलेल्या अशा युद्धांमुळे शेवटी अराजकता निर्माण होते, ज्याची अमेरिकन कुटुंबांना मोठी किंमत मोजावी लागते.” असे म्हणत इशारा दिला आहे. तेल आणि सत्तेची भूक Kamala Harris on Donald Trump। कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्पवर गंभीर आरोप करत,”हे संपूर्ण प्रकरण केवळ तेल आणि स्वतःला एक शक्तिशाली नेता सिद्ध करण्याच्या ट्रम्पच्या इच्छेबद्दल आहे.” असे म्हटले आहे. पुढे त्यांनी, “जर ट्रम्पला खरोखरच लोकशाहीची काळजी असती तर त्यांनी मादुरोच्या मित्रपक्षांशी सौदा केला नसता किंवा कायदेशीर विरोधाकडे दुर्लक्ष केले नसते.” असा आरोप केला आहे. माजी उपराष्ट्रपतींनी आणखी काय म्हटले? कमला हॅरिस यांनी, “राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय आणि बाहेर पडण्याच्या योजनेशिवाय अमेरिकन सैन्याला धोक्यात घालत आहेत. याचा देशाला फायदा होणार नाही, परंतु अब्जावधी डॉलर्सचा खर्च होईल आणि संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, अमेरिकन जनता अशा खोट्या गोष्टींना कंटाळली आहे आणि त्यांना त्यांचे सैन्य अशा मोहिमांमध्ये अडकू इच्छित नाही”. हॅरिस यांनी भर दिला की ,”अमेरिकेला अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे जे आपल्या लोकांना प्रथम स्थान देईल, कामगार कुटुंबांसाठी महागाई कमी करेल आणि कायद्याचे पालन करेल.” हे ऑपरेशन कसे पार पडले? Kamala Harris on Donald Trump। अमेरिकेच्या सैन्याने “अॅब्सोल्युट रिझोल्यू” नावाचे हे अभियान अवघ्या 30 मिनिटांत पार पाडले. अमेरिकन गुप्तचर संस्था गेल्या काही महिन्यांपासून मादुरोच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि लष्कर हळूहळू व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर आपली पकड मजबूत करत आहे. या मोठ्या कारवाईमुळे आता अमेरिकेत राजकीय गोंधळ उडाला आहे, विरोधक ट्रम्पच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.