Joe Root : ‘मी कधीच विराटचा…’, कसोटी मालिकेपूर्वी जो रुटचं कोहलीबाबत मोठं वक्तव्य

Joe Root expresses admiration for Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. जो रूटने सांगितलं की, तो कधीच विराट कोहलीचा स्पर्धक नव्हता. त्याने कबूल केलं की, या मालिकेत कोहलीची अनुपस्थिती त्याला जाणवणार आहे. जो रूट म्हणाला की तो या मालिकेत कोहलीला नक्कीच मिस करेल.”
विशेष म्हणजे, विराट कोहलीने गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहलीच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. जो रूटचं हे विधान कोहलीच्या क्रिकेटमधील प्रभावाचं आणि त्याच्या उपस्थितीचं महत्त्व अधोरेखित करतं. मालिकेपूर्वी रूटच्या या विधानाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मी कधीच विराट कोहलीशी स्पर्धा केली नाही – जो रुट
🚨 Just 2 Days to Go for the England Test! 🏏
🇮🇳 India is all set for the First Test Match!
Led by Captain Gill, with stars like Bumrah, KL Rahul, Siraj, and Pant ready to shine!
Joe Root is the highest run.😧#INDvsENG #TeamIndia #TestCricket #JoeRoot #Gill #Bumrah #Cricket pic.twitter.com/VnJcy9vW6E
— Kholinati!on_👑🚩 (@cryptoHolder09) June 18, 2025
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने आयोजित केलेल्या मीडियाशी संवाद साधताना जो रूट म्हणाला, “मी कधीच विराट कोहलीशी स्पर्धा केली नाही. तो असा खेळाडू आहे, ज्याचं मी नेहमीच कौतुक केलं आहे. त्याच्याबाबत मनात एकचा विचार असायचा की, ‘हा खेळाडू किती अप्रतिम आहे!’ मैदानावरील आमच्यातील लढतीची उणीव मला नक्कीच भासेल. पण यामुळे इतर खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्याची संधी मिळेल.” विराट कोहलीप्रमाणेच रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे.
हेही वाचा – BCCI ला कोर्टाकडून मोठा झटका, IPL मधून बाहेर काढलेल्या ‘या’ संघाला द्यावे लागणार ५३८ कोटी रुपये
विराट-रोहित शिवाय क्रिकेट तितकेसे रंगतदार राहणार नाही –
जो रूट म्हणाला, “विराट-रोहित शिवाय क्रिकेट तितकेसे रंगतदार राहणार नाही. ते दोघे असे भारतीय दिग्गज आहेत, ज्यांनी इतक्या वर्षात भारतीय क्रिकेटला एक वेगळाच दर्जा प्राप्त करुन दिला आहे. ही मालिका थोडी वेगळी असेल, पण तरीही आम्हाला अपेक्षा आहे की ती खूपच चुरशीची होईल.” रूटने भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, बुमराह आपल्या कार्यभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी मालिकेतील सर्व पाच सामन्यांत खेळणार नाही.
हेही वाचा – Rishabh Pant : ‘हा’ खेळाडू विराटच्या जागी खेळणार; इंग्लंडविरुद्धची रणनीती ठरली, उपकर्णधार पंतचा खुलासा
बुमराह आमच्यासाठी एक मोठा धोका ठरणार –
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराह जेव्हाही खेळला आहे, तेव्हा त्याचा प्रभाव खूप जबरदस्त राहिला आहे. तो निश्चितपणे आमच्यासाठी एक मोठा धोका ठरणार आहे. आम्हाला शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जावे लागेल. पण तुम्ही फक्त एकाच गोलंदाजावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. प्रत्येक आव्हानासाठी आणि प्रत्येक गोलंदाजासाठी तुमच्याकडे एक योजना असते. काही वेळा बुमराहला खेळणे कठीण जाईल आणि त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागेल. पण जेव्हा आम्हाला धावा करण्याची संधी मिळेल, तेव्हा त्याचा फायदा घ्यावा लागेल.”





