Rishabh Pant : ‘हा’ खेळाडू विराटच्या जागी खेळणार; इंग्लंडविरुद्धची रणनीती ठरली, उपकर्णधार पंतचा खुलासा

Rishabh Pant Press Conference ahead IND vs ENG Test Series : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने बुधवारी (१८ जून २०२५) पुष्टी केली की, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर, तर तो स्वतः कर्णधारानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाजाची गरज होती, आणि आता गिल हा महत्त्वाचा स्थान भूषवणार आहे.
ऋषभ पंत काय म्हणाला?
ऋषभ पंत पत्रकार परिषदेत म्हणाला, “तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. मात्र, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाबाबत निर्णय झाला आहे. माझ्या मते, शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, आणि मी स्वतः पाचव्या क्रमांकावर खेळेन. बाकीच्या गोष्टींवर आम्ही चर्चा करत राहू.”
मी आणि शुबमन मैदानाबाहेर खूप चांगले मित्र –
Vice-captain 🤝 Captain #TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 | @ShubmanGill pic.twitter.com/xrQLUmemC8
— BCCI (@BCCI) June 18, 2025
ऋषभ पंतने सांगितले की, त्याचे आणि शुबमन गिल यांचे मैदानाबाहेर खूप चांगले नाते आहे. तो म्हणाला, “मला वाटते की मैदानाबाहेर मी आणि शुबमन खूप चांगले मित्र आहोत. जर तुम्ही मैदानाबाहेर चांगले मित्र असाल, तर हे नाते अखेरीस मैदानावरही टिकून राहते. यावर माझा नेहमीच विश्वास आहे.” इंग्लंड संघ जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याविना खेळणार आहे. पंतने सांगितले की, या दिग्गज जोडीला न पाहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे, परंतु तो इंग्लंडच्या सध्याच्या गोलंदाजी आक्रमणाला कमी लेखण्यास तयार नाही.
हेही वाचा – BCCI ला कोर्टाकडून मोठा झटका, IPL मधून बाहेर काढलेल्या ‘या’ संघाला द्यावे लागणार ५३८ कोटी रुपये
इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणात खूप क्षमता –
उपकर्णधार पुढे म्हणाला, “जेव्हा अँडरसन आणि ब्रॉड हे दोघेही संघात नसतात, तेव्हा नक्कीच बरे वाटते. ते इतकी वर्षे इंग्लंडसाठी खेळत आहेत. मी याआधी फक्त दोन दौऱ्यांसाठी येथे आलो आहे. पण सध्याच्या इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणात खूप क्षमता आहे. आम्हाला कोणालाही हलक्यात घ्यायचे नाही, कारण आमचा संघही युवा आहे. ते अजून स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी आम्हाला आमचे क्रिकेट खेळायचे आहे आणि जिथे गरज असेल तिथे गोलंदाजांचा आणि प्रतिस्पर्धी संघाचा आदर करायचा आहे.”





