Wimbledon 2025 : १८ वर्षीय जोआओ फोंसेकाने रचला इतिहास, तिसऱ्या फेरीत मारली धडक

Wimbledon 2025 Updates Joao Fonseca Makes History : जोआओ फोंसेकाने बुधवारी विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करत इतिहास रचला. 18 वर्षीय ब्राझिलियन खेळाडूने तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या कठीण सामन्यात अमेरिकन जेन्सन ब्रूक्सबीचा 6-4, 5-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. आपल्या कारकिर्दीतील केवळ चौथ्या टूर-स्तरीय स्पर्धेत फोंसेकाने आपल्या वयापेक्षा जास्त परिपक्वता दाखवली. कोर्ट 12 वर आव्हानात्मक परिस्थितीशी झुंजताना फोंसेकाने अमेरिकन खेळाडूविरुद्ध संयम राखला.
ईस्टबोर्न येथील अंतिम सामन्यात सहभागी झालेल्या ब्रूक्सबीने काही प्रसंगी यश मिळवले. विशेषतः दुसऱ्या सेटमध्ये आणि चौथ्या सेटच्या ब्रेकदरम्यान 4-4 अशी त्याने बरोबरी साधली. परंतु, फॉन्सेकाने आपल्या सर्व्हिस, वेगवान ग्राउंड स्ट्रोक्स आणि निडर आक्रमकतेने लवकरच हा धोका दूर केला.हा सामना तीन तासांहून अधिक काळ चालला आणि फॉन्सेकाने 50 विनर्स मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यामध्ये चौथ्या सेटच्या सुरुवातीला बेसलाइनच्या मागून मारलेला एक अप्रतिम स्ट्रेच्ड बॅकहँड शॉटदेखील समाविष्ट होता.
Teenage dream at just 18 🇧🇷
Joao Fonseca becomes the youngest man to reach the third round since 2011#Wimbledon pic.twitter.com/R6HkrEHFVY
— Wimbledon (@Wimbledon) July 2, 2025
18 वर्षीय ब्राझिलियन खेळाडूने रचला इतिहास –
SENSATIONAL FONSECA! 🔥🇧🇷
18-year-old João Fonseca becomes the youngest man to reach the third round of Wimbledon since 2011! 😲🌱#JoãoFonseca #Wimbledon2025 pic.twitter.com/hBIXFOkX4x
— Sportskeeda Tennis (@SK__Tennis) July 3, 2025
ब्राझिलियन खेळाडूला सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचा देखील भरपूर पाठिंबा मिळाला. या विजयासह तो 2011 बर्नार्ड टॉमिक नंतर विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. ही 2025 च्या हंगामातील आणखी एक मोठी कामगिरी आहे. फोंसेकाने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपल्या ग्रँड स्लॅम पदार्पणात तत्कालीन जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर असलेल्या आंद्रे रुबलेव्हला पराभूत करून खळबळ उडवून दिली होती.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचे ऐतिहासिक द्विशतक! ही कामगिरी करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार
एका महिन्यानंतर, त्याने ब्यूनस आयर्समध्ये आपले पहिले एटीपी विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर रोलँ गॅरो येथे शानदार कामगिरी करत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. फोंसेकाचा पुढील फेरीत निकोलस जेरी याच्याशी सामना होईल. चिलीच्या या खेळाडूने अमेरिकन किशोर लर्नर टिएन याला पराभूत केले होते. फोंसेका आणि जेरी यांच्यातील सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.





