Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये पोहोचत मोडला फेडररचा विक्रम

याव्यतिरिक्त, जोकोविचने रॉजर फेडररचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी जोकोविच आणि फेडरर दोघांनी प्रत्येकी 13 वेळा विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. क्वार्टर फायनलमध्ये फ्लेव्हियो कोबोलीने पहिला सेट जिंकला होता, पण नोव्हाक जोकोव्हिचने शानदार पुनरागमन करत सामना 6-7(6), 6-2, 7-5, 6-4 अशा फरकाने जिंकला.
✨ 52 Grand Slam semi-finals
✨ 14 #Wimbledon semi-finalsBoth are all-time records in men’s singles 😮💨 pic.twitter.com/AGt7rmPNCs
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2025
यापूर्वीच्या सामन्यातही जोकोव्हिचने असाच विजय मिळवला होता. अंतिम-16 च्या लढतीत त्याने अॅलेक्स डी मिनॉरकडून पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले होते. आता सेमीफायनलमध्ये जोकोव्हिचचा सामना 23 वर्षीय यानिक सिनरशी होणार आहे.
सर्वाधिक वेळा विम्बल्डन पुरुष सेमीफायनलमध्ये पोहोचणारे खेळाडू:
- 14: नोव्हाक जोकोव्हिच [2007, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022, 2023, 2024, 2025]
- 13: रॉजर फेडरर [2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2012, 2014, 2015, 2016, 2017, 2019]
- 11: जिमी कॉनर्स [1974, 1975, 1977, 1978, 1979, 1980, 1981, 1982, 1984, 1985, 1987]
नोवाक जोकोविचच्या आधी, स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझने सेमीफायनलचे तिकीट मिळवले. कार्लोस अल्काराझने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीला सरळ सेट्समध्ये पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये अल्काराझचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी होणार आहे.
All eyes on the Gentlemen’s Singles Trophy 🏆#Wimbledon pic.twitter.com/hhtQ8lB2oD
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2025
इगा स्वियाटेक पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये दाखल –





