Wimbledon 2025 : मोठा उलटफेर! सबालेंकाचा पराभव करत अनिसिमोवाची फायनलमध्ये धडक, स्वियातेकशी होणार सामना

Wimbledon 2025 Anisimova beat Sabalenka in Semi final : विम्बलडनच्या १३८ व्या हंगामात महिला एकेरी स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. तेराव्या मानांकित अमांडा अनिसिमोवाने अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाला पराभूत करत आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये अनिसिमोवाने दमदार खेळ करत सबालेंकाला 6-4, 4-6, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. हा सामना दोन तास 36 मिनिटे चालला. चौथ्या मॅच पॉइंटवर फोरहँड विनर मारत अनिसिमोवाने हा विजय निश्चित केला.
मोठ्या उलटफेरनंतर अमांडा अनिसिमोवा काय म्हणाली?
सामना जिंकल्यानंतर अमांडा अनिसिमोवा म्हणाली, “हे अजूनही खरे वाटत नाही. मी हा विजय कसा मिळवला, हे मलाच कळत नाही.” आता शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात तिचा सामना इगा स्वियातेकशी होईल. स्वियातेकने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बेलिंडा बेनसिचला पराभूत केले. या सह विम्बलडनला सलग आठव्या वर्षी नवी महिला विजेती मिळणार आहे. आर्यना सबालेंका ऑक्टोबर 2024 मध्ये इगा स्वियातेकला मागे टाकत अव्वल स्थानी पोहोचली होती.
One hand on the Ladies’ Singles Trophy.
Centre Court awaits a spectacle 🌱#Wimbledon pic.twitter.com/2AbRRnqaIK
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2025
आर्यना सबालेंकाची हुकली संधी –
The moment Amanda Anisimova became a #Wimbledon finalist for the first time ✨ pic.twitter.com/tUBSsFCaoZ
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2025
मात्र, या पराभवामुळे तिला सेरेना विल्यम्सनंतर सलग चार ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारी पहिली महिला खेळाडू होण्याची संधी गमवावी लागली. 23 वर्षीय अनिसिमोवाची विम्बलडन संपल्यानंतर WTA क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान निश्चित आहे, मग अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागो. सबालेंकाला गेल्या वर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे विम्बलडनमधून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये तिने अमेरिकन ओपन जिंकत आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा – IND vs ENG : नाद करा पण बुमराहचा कुठं..! रूट-स्टोक्सचा त्रिफळा उडवत इंग्लंडची मोडली कंबर, पाहा VIDEO
अमांडा अनिसिमोवाचा प्रेरणादायी प्रवास –
अमांडा अनिसिमोवाने मानसिक थकव्या (बर्नआउट) मुळे गेल्या वर्षी टेनिसमधून विश्रांती घेतली होती. न्यू जर्सीमध्ये जन्मलेली आणि फ्लोरिडामध्ये वाढलेली अनिसिमोवा 17 व्या वर्षी 2019 च्या फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती, परंतु तिथे तिला पराभव पत्करावा लागला. मे 2023 मध्ये तिने जवळपास एक वर्ष मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असल्याचे सांगत टूरमधून विश्रांती घेतली होती. तिचा हा पुनरागमनाचा प्रवास आणि विम्बलडन 2025 मधील फायनलपर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.





