Wimbledon 2025 : इगा स्वियातेकने पहिल्यांदाच पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद, अनिसिमोवाला चारली धूळ

Wimbledon 2025 Womens Singles Final : विम्बलडनच्या 138 व्या हंगामातील महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी पोलंडच्या इगा स्वियातेक आणि अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा यांच्यात पार पडला. या रोमांचक लढतीत स्वियातेकने विजेतेपद पटकावले आणि पहिल्यांदाच विम्बलडनची ट्रॉफी जिंकली. स्वियातेकने लंडनच्या सेंटर कोर्टवर फक्त 57 मिनिटांत 6-0, 6-0 अशी दमदार विजय मिळवला.
दोघेही पहिल्यांदाच पोहोचल्या होत्या फायनलमध्ये –
अनिसिमोवाने उपांत्य फेरीत जगातील नंबर 1 खेळाडू आर्यना सबालेंकाला पराभूत केले होते, पण अंतिम सामन्यात ती स्वियातेकपुढे टिकू शकली नाही.हा सामना लंडनच्या सेंटर कोर्टवर खेळला गेला. विशेष म्हणजे, 13व्या मानांकित अनिसिमोवा पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. दुसरीकडे, चार वेळा फ्रेंच ओपन आणि एकदा अमेरिकन ओपन जिंकणारी इगा स्वियातेकही पहिल्यांदाच विम्बलडनच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती.
Grass, mastered. 🏆
Iga Swiatek is Poland’s first Wimbledon singles champion 🇵🇱 pic.twitter.com/5fsPpX4ANC
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2025
स्वियातेकने पहिला सेट 25 मिनिटांत जिंकला –
The new #Wimbledon champion soaking in every single moment 🥹 pic.twitter.com/rV419BKHyH
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2025
इगा स्वियातेकने पहिला सेट फक्त 25 मिनिटांत 6-0 ने जिंकला. तिने अमांडा अनिसिमोवाला एकही गेम न देता सेट खिशात घातला. अनिसिमोवाने 14 अनफोर्स्ड एरर केल्या, तर स्वियातेकने फक्त 2 एरर केल्या. दुसऱ्या सेटमध्येही स्वियातेकने वर्चस्व राखले आणि एका तासापेक्षा कमी वेळात तिने विजेतेपद पटकावले.
हेही वाचा – IND vs ENG : धक्कादायक! नितीश रेड्डी बेन स्टोक्सचा वेगवान बाउन्सर लागल्याने कोसळला
आठव्या मानांकित इगा स्वियातेकने सेमीफायनलमध्ये बेलिंडा बेनसिचला 6-2, 6-0 अशी धूळ चारली आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे, 23 वर्षीय अमांडा अनिसिमोवाने अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाला तीन सेटच्या थरारक लढतीत 6-4, 4-6, 6-4 ने पराभूत करून फायनल गाठली होती.
इगा स्वियातेकने जिंकले सहावे ग्रँडस्लॅम –
I6A 🏆🏆🏆🏆🏆🏆@iga_swiatek moves to 6-0 in Grand Slam finals 🇵🇱#Wimbledon pic.twitter.com/56iQThkGV6
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2025
इगा स्वियातेकने तिचे सहावे ग्रँडस्लॅम जिंकले इगा स्वियातेकच्या कारकिर्दीतील हे एकूण सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी तिने चार वेळा फ्रेंच ओपन (2020, 2022, 2023, 2024) आणि एकदा यूएस ओपन (2022) जिंकले होते. तिला अद्याप ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकता आलेले नाही. तसेच, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’
पुन्हा एकदा मिळाली नवी विजेती –
2016 पासून दरवर्षी विम्बलडनमध्ये नवीन महिला खेळाडूने सिंगल्सचे विजेतेपद पटकावले आहे. 2016 नंतर गार्बाइन मुगुरुजा (2017), एंजेलिक कर्बर (2018), सिमोना हालेप (2019), ऐश बार्टी (2021), एलेना रिबाकिना (2022), मार्केटा वोंड्रोसोवा (2023) आणि बारबोरा क्रेजिकोवा (2024) यांनी विम्बलडन ट्रॉफी जिंकली. यंदाही विम्बलडनला नवीन महिला विजेती मिळाली आहे आणि इगा स्वियाlsकने हे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.





