Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

अल्काराझने पहिला सेट 6-4 ने जिंकून सिनरवर सुरुवातीला वर्चस्व गाजवले. पण त्यानंतर सिनरने सलग तीन सेट जिंकत केवळ सामना खिशात घातलाच नाही, तर फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यातील पराभवाचाही वचपा काढला आणि प्रथमच विम्बल्डन चॅम्पियन बनला. अल्काराज सलग तीन वर्षे ग्रास-कोर्ट मेजर जेतेपद जिंकणारा पाचवा खेळाडू बनण्याच्या उद्देशाने खेळत होता. त्याने शानदार सुरुवातही केली, पण लवकरच त्याच्या खेळाची लय बिघडली.
Calling all Champions 🏆
Presenting the 2025 #Wimbledon roll of honour, beginning with Jannik Sinner ✨ pic.twitter.com/1PMUURokv6
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2025
अल्काराझने सलग 24 सामन्यांमध्ये मिळवला होता विजय –
यंदाच्या विम्बलडन फायनलपूर्वी कार्लोस अल्काराझने सलग 24 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्याने इटालियन ओपन, फ्रेंच ओपन आणि क्वीन्स क्लब (HSBC) चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले होते. या स्पॅनिश खेळाडूने आपला विजयी लय विम्बलडनच्या उपांत्य फेरीपर्यंत कायम राखली. मात्र, अंतिम सामन्यात त्याला यानिक सिनरकडून पराभव पत्करावा लागला. सिनरसाठी हा विजय खास होता, कारण यापूर्वी अल्काराझविरुद्धच्या सर्व पाच सामन्यांमध्ये त्याला हार पत्करावी लागली होती. विशेष म्हणजे, सिनरला अल्काराझविरुद्ध पहिला विजय ग्रँड स्लॅम फायनलमध्ये मिळाला.
हेही वाचा –सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय
पहिल्या सेटमध्ये अल्काराझचे शानदार पुनरागमन –
सिनरने सामन्याची जोरदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीला ब्रेक मिळवत 3-2 अशी आघाडी घेतली आणि अल्काराझच्या सर्व्हिसवर दबाव टाकला. पण स्पॅनिश खेळाडूने झटपट पुनरागमन करत ब्रेकबॅक मिळवला आणि पहिल्या सेटवर वर्चस्व राखले. सिनरच्या 13 अनफोर्स्ड चुका आणि अल्कारेजच्या 11 विनर्सच्या जोरावर त्याने अवघ्या 44 मिनिटांत पहिला सेट जिंकला. यानंतर सलग तीन सेटमध्ये बाजी मारत सिन्नरने ट्रॉफीवर नाव कोरले. त्यामुळे कार्लोसचे सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग पावले.
हेही वाचा – IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण
कोणाला किती मिळाळं बक्षीस?
विम्बल्डन 2025 च्या पुरुष एकेरी विजेतेपदाचा मानकरी यानिक सिनरला मोठी बक्षीस रक्कम मिळाली. सिनरला 30 लाख पाउंड मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, उपविजेता कार्लोस अल्काराझलाही मोठी रक्कम मिळाली. त्याला 15 लाख 20 हजार पाउंड मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 17 कोटी रुपये आहे.





