नवी दिल्ली – 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. याचपार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज मिझोराममधील दोन आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकासह तीन जणांना मरणोत्तर सर्वोत्तम जीवन रक्षा पदक प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय 7 उत्तम जीवन रक्षा पदके आणि 21 जीवन रक्षा पदकेही प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोत्तम जीवन रक्षा पदक 2023 ला आज मंजुरी दिली आहे.
जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार हा एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी आणि मानवतावादी स्वभावाच्या गुणवत्तेसाठी दिला जातो. हा पुरस्कार सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक अशा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात. विशेष म्हणजे हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो.
बेस्ट लाइफ सेव्हिंग मेडल
-मास्टर अँथनी वानमाविया (मरणोत्तर), मिझोरम
-मेलडी लालरेमृती (मरणोत्तर), मिझोरम
-सूरज आर (मरणोत्तर), केंद्रीय राखीव पोलीस दल
उत्तम जीवन रक्षा पदक
-साहिल भिसू लाड, गोवा
-काजल कुमारी, झारखंड
-नवीन कुमार डी, तेलंगणा
-विनोद कुमार, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
-हवालदार शेराराम, संरक्षण मंत्रालय
-मुकेश कुमार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
-नरेश कुमार, राष्ट्रीय तपास यंत्रणा
जीवन रक्षा पदक
-आदिका राजाराम पाटील, महाराष्ट्र
-प्रियांका भरत काळे, महाराष्ट्र
-सोनाली सुनील बालोदे, महाराष्ट्र
-एमएस अनिल कुमार, अंदमान आणि निकोबार बेटे
-जितम परमेश्वर राव, आंध्र प्रदेश
-समरजित बासुमतारी, आसाम
-सुदेश कुमार, चंदीगड
-जस्टिन जॉर्ज, केरळ
-विल्सन, केरळ
-पद्मा बारीक, लडाख
-मोहम्मद अफजल, लडाख
-मारिया मायकल ए, तामिळनाडू
-एस विजयकुमार, तामिळनाडू
-नरेश जोशी, उत्तराखंड
-अर्जुन मलिक, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
-अमित कुमार सिंग, सीमा सुरक्षा दल
-शेर सिंग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
-सोनू शर्मा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
-अब्दुल हमीद, संरक्षण मंत्रालय
-सुनील कुमार मिश्रा, संरक्षण मंत्रालय
-शशिकांत कुमार, रेल्वे मंत्रालय