Sanjana Ganesan : अंगदला ट्रोल करणाऱ्यांना संजनाचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘आमचा मुलगा तुमच्या…’

Sanjana Ganesan Slams Trolls Targeting Son Angad in IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यानंतर, जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगद बुमराहला व्हायरल फुटेज शेअर करून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, संजना गणेशनने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सोशल मीडियावर तिच्या मुलाला ट्रोल करणाऱ्या फटकारले आहे.
अंगदला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली संजना –
सामन्यानंतर शेअर झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओच्या आधारे अंगदबद्दल खोटे अंदाज बांधणाऱ्यांना संजना गणेशनने फटकारले आणि त्यांना ते थांबवण्याचे आवाहन केले. संजनाने इन्स्टाग्वर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले की, “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. कारण इंटरनेट हे एक वाईट ठिकाण आहे.
Shame on chufa who uses a toddler for his engagement..
Arrest him asap @SanjanaGanesan pic.twitter.com/uYWPiE4hRL— K (@kurkureter) April 28, 2025
अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी आलो होतो –
Jr.Bumrah appreciating Sr.Bumrah#bumrah #sanjanaganesan #mivslsgtickets #goenka #ESADay #mi #lsg #RishabhPant pic.twitter.com/oYw2zSaXEN
— SarpanchSaab (@kitts1727) April 27, 2025
संजनाने पुढे लिहिले. “मला कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम पूर्णपणे समजतात, परंतु कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो, दुसरे काहीही नाही. आम्हाला आमच्या मुलाला इंटरनेटवर व्हायरल कंटेंट किंवा राष्ट्रीय बातम्या बनवण्यात रस नाही. जिथे अनावश्यक मतप्रवाह असलेले कीबोर्ड योद्धे ३ सेकंदांच्या फुटेजवरून अंगद कोण आहे, त्याची समस्या काय आहे, त्याचे व्यक्तिमत्व काय आहे हे ठरवतात.”
हेही वाचा – MI vs LSG : बिश्नोईने खणखणीत षटकार ठोकताच बुमराहने लावला डोक्याला हात, VIDEO होतोय व्हायरल
आघात आणि नैराश्यासारखे शब्द वापरणे चुकीचे –
बुमराहची पत्नी पुढे म्हणाली, “अंगद दीड वर्षांचा आहे. मुलाच्या संदर्भात आघात आणि नैराश्यासारखे शब्द वापरणे हे आपण एक समुदाय म्हणून काय बनत आहोत याबद्दल बरेच काही सांगते आणि ते खरोखर दुःखद आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे मत त्यानुसारच ऑनलाइन मांडा. आजच्या जगात थोडीशी प्रामाणिकता आणि थोडासा दयाळूपणा पण खूप कामाचा आहे.”





