Bumrah Misses ODIs : टी-२० नंतर आता वनडेतूनही बुमराह बाहेर? न्यूझीलंड दौऱ्याआधी बीसीसीआयने आखला मोठा मास्टर प्लॅन!
Bumrah Misses ODIs : जसप्रीत बुमराह न्यूझीलंड दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. या मागे नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊया

Jasprit Bumrah Likely to Miss New Zealand ODI Series Focus on Test Matches : भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंडच्या दीर्घ दौऱ्यावर रवाना होणार असून या दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टी-२० संघातून आधीच विश्रांती मिळालेला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता आगामी एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापन न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त राहावा यासाठी त्याला वनडे मालिकेतून विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
सात नोव्हेंबरपासून खेळणार इंडिया अ कडून रेड बॉल सामना –
न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून टी-२० मालिकेने होणार असून चार नोव्हेंबरपासून एकदिवसीय सामने खेळवले जातील. याच काळात भारत अ संघ न्यूझीलंड अ विरुद्ध तीन बहुदिवसीय सामने खेळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुमराह सात नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या चार दिवसीय सामन्यात भारत अ संघाकडून खेळून रेड बॉलच्या क्रिकेटचा सराव करेल. त्यानंतर तो थेट १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल.
सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये वर्कलोड व्यवस्थापन; थेट कसोटीवर लक्ष –
🚨 Team India’s plan for Jasprit Bumrah ahead of the New Zealand Tests: (TOI)
•Fully fit, but workload will be managed carefully.
•Unlikely to feature in the five-match ODI series.
•Expected to play the third India A match for red-ball preparation.
•Focused on building up https://t.co/WlvK1DZDAn— The Cricket Chronicles (@HarshitKum65901) October 15, 2026
३२ वर्षीय बुमराह सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असून या महिन्याच्या अखेरीस तो सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होणार आहे. न्यूझीलंडचा दौरा आणि त्यानंतर भारतात होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका लक्षात घेता त्याच्या कामाच्या ताणाचे काटेकोर व्यवस्थापन केले जात आहे. कसोटी मालिकेत बुमराहला पूर्ण ताकदीने मैदानात उतरवायचे असल्याने त्याला वनडे मालिकेत खेळवून थकवण्याचा धोका व्यवस्थापनाला पत्करायचा नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्यासाठी बुमराह महत्त्वाचा –
As per reports, Jasprit Bumrah will be rested for the New Zealand ODIs, while keeping him fully fit for the forthcoming two-match Test series against the Kiwis. 👀🏏
📸: BCCI/X
#indvsnz #jaspritbumrah #teamindia #viral #cricket https://t.co/vZ0pva1AR1
— OneTurf News (@oneturf_news) October 15, 2026
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित सात कसोटी सामन्यांपैकी किमान सहा विजय आवश्यक आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धचे दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे घरच्या मैदानावरील पाच सामने समाविष्ट आहेत. बुमराहने नोव्हेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटपासून दूर असल्याने आगामी कसोटी मालिकांसाठी त्याचे संघात असणे भारतासाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहे.
हर्षित राणा आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता
बुमराहच्या अनुपस्थितीत एकदिवसीय संघात हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णा यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. तसेच अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. कसोटी संघात निवड होणारे खेळाडू एकदिवसीय मालिकेतील अखेरचे दोन सामने सोडून रेड बॉलच्या सरावासाठी जाणार असल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना या दौऱ्यावर आजमावले जाण्याची शक्यता आहे.





