Hanuma Vihari Demands : “बुमराह-हार्दिकच्या भरवशावर २०२७ चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही…”, टीम इंडियाला माजी भारतीय खेळाडूचा इशारा
Hanuma Vihari Demands : वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. ३५१ धावांचा बचाव करण्यात आलेल्या त्यांच्या अपयशामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Hanuma Vihari Demands Bhuvneshwar Kumar Shami Comeback Team India Bowling Exposed : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३५१ धावांचा भलामोठा डोंगर उभारूनही भारताला ५ गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताचा माजी कसोटीपटू हनुमा विहारीने (Hanuma Vihari) यावर तीव्र नाराजी व्यक्त करत निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे.
हनुमा विहारीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तिसऱ्या वनडेतील गोलंदाजांच्या महागड्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली. त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांना तातडीने संघात परत आणण्याची आग्रही मागणी केली आहे. आगामी २०२७ विश्वचषकासाठी भारत केवळ बुमराह आणि पंड्यावर अवलंबून राहू शकत नाही, असा इशाराही त्याने दिला.
“३५० धावांचा बचाव न होणे धोक्याची घंटा!”; विहारीचा संघ व्यवस्थापनावर प्रहार
हनुमा विहारी म्हणाला, “मूळ विश्वचषकात नसलेला वेस्ट इंडिज संघ जर आपल्या गोलंदाजीची पिसं काढत असेल, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होणार? ३५० धावांचा बचाव न होणे ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असून संघ पुढे जाण्याऐवजी मागे जात आहे.” अंशुल कांबोज, गुरनूर ब्रार आणि नितीश कुमार रेड्डी सपाट खेळपट्टीवर दबाव पेलू शकले नाहीत, त्यामुळे गोलंदाजीची गंभीर समीक्षा झाली पाहिजे, असेही त्याने नमूद केले.
केवळ बुमराह-हार्दिकवर अवलंबून राहणे चूक; शमी-भुवीची हवी वापसी
Is Team India actually going backwards? Hanuma Vihari’s blunt verdict after a rare failure to defend 350.
Hanuma Vihari said:
“I think the team is going backwards.”
He pointed out that India failing to defend a total of 350 happens only on very rare occasions. He said the side… pic.twitter.com/5vAUYNhJ52
— Cricket Hub (@Anurag9793) October 4, 2026
विहारीच्या मते, नव्या चेंडूने आणि पॉवरप्लेमध्ये बळी मिळवण्यासाठी अनुभवाला कोणताही पर्याय नसतो. २०२३ च्या विश्वचषकात बुमराह, शमी आणि सिराजच्या त्रिकुटाने भारताची ही समस्या सोडवली होती. मात्र, बुमराहचा वर्कलोड आणि सिराजच्या फॉर्मातील सातत्याचा अभाव यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. जर प्रमुख गोलंदाज जखमी झाले, तर भारताकडे मजबूत बॅकअप नाही. अशा वेळी कठीण परिस्थितीत ब्रेकथ्रू मिळवण्यासाठी भुवनेश्वर आणि शमीसारख्या अनुभवी गोलंदाजांची देशाला खरी गरज असल्याचे विहारीने ठामपणे सांगितले.
भुवीची आयपीएलमध्ये तुफानी कामगिरी; ३० सामन्यांत ४५ विकेट्स!
भुवनेश्वर कुमारने २०२२ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, त्यानंतर दुखापतींमुळे तो संघाबाहेर राहिला. मात्र आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळताना त्याने २०२५ आणि २०२६ च्या सलग दोन हंगामांत ३० सामन्यांमध्ये ४५ बळी घेत तुफानी पुनरागमन केले आहे. नव्या चेंडूवर भुवीकडे असणारा स्विंग आणि नियंत्रण सध्या भारतीय आक्रमणात दिसत नसल्याचे विहारीने अधोरेखित केले.





