Jasprit Bumrah : ‘मी तुम्हाला बोलावलं नव्हतं…’, जस्सीचा पापारांझीवर अचानक का चढला पारा? VIDEO होतोय व्हायरल

Jasprit Bumrah Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनंतर विश्रांती घेत आहे. आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी, जी 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, या मालिकेसाठी बुमराहची निवड झालेली नाही. मात्र, त्याच दौऱ्यावरील टी-20 मालिकेत तो मैदानावर उतरणार आहे, तत्पूर्वी जस्सीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापारांझीवर संतापलेला दिसत आहे.
बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावर पापाराझींवर संतप्त झालेला दिसतो. व्हिडीओत दिसते की, खांद्यावर बॅग घेऊन बाहेर पडताना पापाराझी त्याच्या मागे लागले होते. सुरुवातीला आश्चर्यचकित झालेला बुमराह थोडा थांबतो, पण नंतर हळूहळू पुढे चालू लागतो.
View this post on Instagram
त्याने पापाराझींना स्पष्ट शब्दांत सुनावले, “मी तुम्हाला इथे बोलावले नव्हते. तुम्ही दुसऱ्या कोणासाठी आला होतास; ते येणार असतील.” मात्र, पापाराझी मागे हटले नाहीत. त्यापैकी एकाने मजा करत म्हटले, “बुमराह, आम्हाला तुम्ही दिवाळी बोनस म्हणून भेटला आहात.” हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक –
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या नियोजनानुसार, एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे, दुसरा सामना अॅडलेड ओव्हल येथे आणि तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल, आणि शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
टी-20 मालिकेत बुमराहची महत्त्वाची भूमिका –
टी-20 मालिकेत बुमराहची उपस्थिती भारतीय संघाच्या गोलंदाजीला निश्चितच बळकटी देईल. त्याच्या आक्रमक आणि अचूक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत मोठा फायदा होऊ शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला असला, तरी क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता बुमराहच्या टी-20 मालिकेतील पुनरागमनाकडे लागले आहे.
हेही वाचा – Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय! ‘या’ व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.





