GT vs MI : साई-वॉशिंग्टनच्या फटकेबाजीमुळं बुमराह-जयवर्धनेची जुंपली, PHOTOS होतायेत व्हायरल

GT vs MI Jasprit Bumrah and Coach Jayawardene argument : शुक्रवारी रात्री झालेल्या एलिमिनेटर सामन्यात पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. गुजरातने हा सामना २० धावांनी गमावला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. आता एमआयचा सामना १ जून रोजी अहमदाबादमध्ये दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जशी होईल. दरम्यान या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि कोच महेला जयवर्धने यांच्यात सीमारेषेवर वाद झाल्याची चर्चा आहे.
बुमराह आणि जयवर्धने यांच्यात वाद –
एलिमिनेटर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई इंडियन्स फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये गुजरात टायटन्सपेक्षा चांगले दिसत होते. पण, एक काळ असा होता जेव्हा साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर फलंदाजी करत होते. त्यावेळी मुंबईच्या संघात गोंधळ उडाला होता. प्रत्येकजण कोणत्याही प्रकारे दोन्ही खेळाडूंची भागीदारी तोडू इच्छित होता. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि जसप्रीत बुमराह यांच्यात सीमारेषेवर वाद झाला.
बुमराह आणि जयवर्धने यांच्यात सीमारेषेवर जुंपली –
JASPRIT BUMRAH vs MAHELA JAYAWARDANE
Mahela Jayawardane was telling Jasprit Bumrah but he didn’t seemed interested. This made Jayawardane unhappy #IPL2025 #JaspritBumrah #MIvsGT #GTvsMI pic.twitter.com/nYAJ7RL6AC
— Priyanshu Kumar (@priyanshusports) May 30, 2025
खरं तर, ही घटना गुजरात टायटन्सच्या डावाच्या १३ व्या षटकात घडली. हे षटक ट्रेंट बोल्ट टाकत होता. षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर कॅमेरा सीमारेषेवर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहकडे गेला. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने सीमारेषेबाहेर दिसले, जे बुमराहला काहीतरी सांगत होते. पण, बुमराह त्याच्याशी सहमत दिसत नव्हते. जयवर्धने देखील यावर रागावलेले दिसत होते. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. त्यांचे हावभाव आणि कृती हेच सांगत होती. पण, ती गोष्ट काय होती, हे कळले नाही.
हेही वाचा – GT vs MI : चंदीगडच्या रणसंग्रामात मुंबईने बाजी मारल्याने गुजरातचा चिमुकला फॅन भावुक, VIDEO व्हायरल
सामन्यात अखेर मुंबईने मारली बाजी –
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर रोहित शर्माच्या ८१ धावांच्या जलद खेळी आणि जॉनी बेअरस्टोच्या जलद ४७ धावांच्या खेळीमुळे, मुंबईने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या. सूर्यकुमार यादव (३३), तिलक वर्मा (२५) आणि हार्दिक पंड्या (२२*) यांनीही जलद खेळी केली. २२९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातला निर्धारित षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात फक्त २०८ धावा करता आल्या आणि २० धावांनी सामना गमावला. साई सुदर्शनने ८० धावांची शानदार खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरनेही ४८ धावा केल्या.





