\n\nThat winning feeling 🥳@mipaltan fans, how delighted are you? 😉
\nScorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI pic.twitter.com/7U2ABgTRsK
\n— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
\nतिलक वर्माच्या फलंदाजीचा खरा थरार डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळाला. त्याने १६ ते २० व्या षटकांदरम्यान केवळ १८ चेंडूंत ६५ धावा कुटल्या. १८ व्या षटकात त्याने अशोक शर्माला लक्ष्य करत २६ धावा वसूल केल्या. त्याने आपल्या २२४ च्या स्ट्राईक रेटने केलेल्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. तिलकला नमन धीर (४५ धावा) याने मोलाची साथ दिली, ज्यामुळे मुंबईने १९९ धावांचा डोंगर उभा केला. गुजरातसाठी कगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
\n\nAnnouncing his arrival in style, again!! 🔥
\nAshwani Kumar with terrific figures of 4/24 🤩
\nWATCH HIS SPELL ▶️ https://t.co/T9FmpAKlrP#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @mipaltan pic.twitter.com/zk0YQNjvxr
\n— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
\n२०० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातचा कोणताही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. गुजरातचा संपूर्ण संघ १५.५ षटकांत १०० धावांत गारद झाला. मुंबईने हा सामना ९९ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. या सामन्यात मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने २४ धावा खर्च करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.