GT vs MI : चंदीगडच्या रणसंग्रामात मुंबईने बाजी मारल्याने गुजरातचा चिमुकला फॅन भावुक, VIDEO व्हायरल

GT vs MI Gujarat Titans fan crying after MI Defeat his team: आयपीएल २०२५ च्या हंगामाचा रोमांच अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे चाहत्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री या हंगामातील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चंदीगडमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव करत दुसरा क्वालिफायरमध्ये धडक मारली. ज्यामुळे गुजरातच्या पदरी निराशा आली. यानंतर त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने साखळी फेरीत शानदार कामगिरी करत १४ पैकी ९ सामने जिंकले आणि गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले होते. यामुळे त्यांना आयपीएल २०२५ च्या जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये संघाला सलग पराभव पत्करावे लागले. ज्यामुळे त्यांची आणि त्यांच्या चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. मात्र, यादरम्यान एका चिमुकल्या चाहत्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायल झाला आहे.
चिमुकल्या चाहत्याला अश्रू अनावर –
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या रंगतदार सामन्यात गुजरात टायटन्स विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण शेवटच्या षटकांमध्ये सामना मुंबईच्या पारड्यात झुकला. केवळ ३० धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गुजरातच्या चाहत्यांचे डोळे पाणावले. सामना गमावल्यानंतर एका लहान मुलाचा अश्रू पुसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या कुटुंबीयांना भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – GT vs MI : मुंबईच्या विजयात गुजरातच्या खेळाडूने बजावली महत्त्वाची भूमिका, स्वत:च्या पायावर मारली ‘कुऱ्हाड’
मुंबईने सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी दावा केला मजबूत –
या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या जोडीने हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. पॉवरप्लेमध्येच मुंबईने ७९ धावा केल्या. बेअरस्टोने फक्त २२ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची जलद खेळी केली. तसेच रोहित शर्माने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शानदार ८१ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने ३३ (२०) आणि तिलक वर्माने २५ (११) धावा केल्या, तर कर्णधार हार्दिकने २२ (९) धावा केल्या. त्यामुळे मुंबईला २२८ धावांपर्यंत मजल मारता आली.





