कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज पुन्हा आक्रमक; आजपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू

Mumbai Kabutarkhana Protest | दादरमधील बंद केलेला कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्यावरून आजपासून जैन समाजाकडून उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून जैन समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीत आजपासून आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात होत आहे.
आज सकाळी कुलाबा जैन मंदिरातून मोर्चा निघाला असून हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार आहे. तिथेच उपोषण आंदोलन सुरू होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर जैन समुदायातील बांधव, पक्षीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू’, असा थेट इशारा निलेशचंद्र यांनी सरकारला दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा लक्षात घेऊन कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात जैन धर्मगुरू आणि समुदायातात नाराजी पसरली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केला. त्यानंतर मात्र, जैन समुदायाने याचा आक्रमक विरोध करत ताडपत्री आणि शेड लावून बंद केलेला कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या आंदोलनाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने देखील आंदोलन केले. Mumbai Kabutarkhana Protest |
चार पर्यायी जागा
दरम्यान, मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणचे कबुतरखाने बंद केल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखान्यासाठी चार पर्यायी जागा सुचवल्या आहेत. या ठिकाणी सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील. मुंबई महापालिकेने वरळी जलाशय, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जागा सुचवल्या आहेत. Mumbai Kabutarkhana Protest |
आंदोलकांचा विरोध
परंतु पालिकेने दिलेल्या चार पर्यायी जागा गैरसोयीच्या असून, त्या ४ ते ९ किलोमीटर लांब असल्याने कबुतर तिथे जाणार नाहीत. दादरचा कबुतरखाना शंभर वर्षे जुना असून ते कबुतरांचे घर आहे आणि त्यांना हक्क मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही आंदोलकांनी म्हटले आहे. Mumbai Kabutarkhana Protest |
हेही वाचा:
तेलंगणामध्ये भीषण अपघात ! ७० जणांना घेऊन जणाऱ्या बसची ट्रकला धडक ; २० जणांचा जागीच मृत्यू





