Maratha Reservation : आझाद मैदानावर आंदोलकांची तोबा गर्दी; मराठा आरक्षणामुळे कोंडी! सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आझाद मैदानावरून सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात झाली आहे. जरागेंना आठ तासांचा अवधी आंदोलनस्थळी देण्यात आला आहे.
मात्र, जरागेंनी यांनी आंदोलनस्थळावरून बोलताना आता मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. तसेच आझाद मैदानावर मराठा आंदोलक बांधवांची तोबा गर्दी झाली आहे. अशातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. आंदोलनामुळे सरकारची कोंडी झाली असून यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाचे शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलण्यात आलं आहे. तसेच राज्य शासनाचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी थेट आझाद मैदान गाठलं. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही, असा पक्का निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे.
काही तोडगा निघणार का?
मुंबईत ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. मनोज जरांगेंनी सरकारने चर्चेसाठी यावे, असं म्हटलं आहे. यामुळे आता सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या वतीने सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानवर जाऊन जरांगेंची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे भेटीनंतर काही तोडगा निघणार का? हे पाहणं औचुक्याचं असणार आहे.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम महाराष्ट्रात सुरू आहे. याशिवाय मुंबईतही गणेशोत्सवामुळे भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मनोज जरागेंच्या उपोषणावर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस असणार आहे. यामुळे याबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळात कोण असणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
- मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
- हैद्राबाद गॅझेटियर लागू करा सातारा बाँगे गॅझिटेयर लागू करावे.
- ज्याची कुणबी नोंद सापडली आहे, त्याचे सगे सोयरे घ्या
- सगे सोयरे ही पोट जात म्हणून समावेश करा
- मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत
- कायद्यात बसणारे आरक्षण द्या
हेही वाचा : पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई ; पोलिसांनी केली अटक





