मनसेच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी! ‘दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच….,’ म्हणत मनसेने लगावला टोला

MNS Deepotsav | मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे दीपोत्सव साजरा केला जातो. यंदही मनसेनं दीपोत्सवाचं आयोजन केलं. मात्र आता मनसेच्या दीपोत्सवाची थेट सरकारनं जाहिरात केली. पण यात मनसेचा उल्लेख केलेला नाही. यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.
पर्यटन विभागानं ही जाहिरात दिली केली आहे. इतकंच काय, तर या जाहिरातीतून दीपोत्सवाला येण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. ‘मुंबईतील दिवाळीची जादू अनुभवा… अशा ओळींमध्ये दीपोत्सवाचं वर्णन एका व्हिडीओसह सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. मनसेनंही शासनाच्या या पोस्टची दखल घेत सरकारच्या या जाहिरातीवर जोरदार आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे… दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३… https://t.co/EAC3vLlH1p
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2025
गेली १३ वर्ष दीपोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करतोय
‘दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील…पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. MNS Deepotsav |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता… नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . .
…त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या
आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं, अशा शब्दांत ‘मनसे अधिकृत’ या पेजवरून ही नाराजी व्यक्त करण्यात आली.MNS Deepotsav |
हेही वाचा
पहिल्या दिवशी कोण ठरलं वरचढ? थामा की एक दीवाने की दीवानियत? पाहा बॅाक्स अॅाफिस कलेक्शन….





