टी-२० विश्वचषकासाठी तगड्या संघाची घोषणा! ४२ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार; जसप्रीतलाही मिळाली संधी

Italy Announce Squad for T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना, युरोपियन देश इटलीने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत इटलीचा संघ प्रथमच सहभागी होत असून, हा त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिलाच आयसीसी मोठा दौरा असणार आहे.
वेन मॅडसेनकडे नेतृत्व; जो बर्न्सचा पत्ता कट –
इटली क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी अनुभवी वेन मॅडसेनला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ४२ वर्षीय मॅडसेनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जो बर्न्स याच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता होती, मात्र बोर्डासोबतचे संबंध बिघडल्याने कप्तानीमध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संघात भारतीय वंशाचा जसप्रीत सिंह यालाही स्थान मिळाले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ स्टार इटलीकडून खेळणार!
इटलीच्या संघ निवडीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जे. जे. स्मट्स (JJ Smuts). स्मट्सने २०२१ पर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. आता तो इटलीच्या जर्सीत विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. त्याच्या अनुभवामुळे इटलीच्या फलंदाजीला मोठी ताकद मिळणार आहे.
- गटात बलाढ्य संघांचे आव्हान; ईडन गार्डन्सवर पदार्पण
- इटलीला विश्वचषकासाठी ‘ब’ गटात (Group C) ठेवण्यात आले असून त्यांच्यासमोर कठीण आव्हान आहे:
- गटातील संघ: बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली.
- पहिला सामना: ९ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी इटलीचा संघ:
वेन मॅडसेन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो (यष्टीरक्षक), जियान पिएरो मीडे, जैन अली, अली हसन, क्रिस्चन जॉर्ज, हॅरी मॅनेंटी, अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, सय्यद नकवी, बेंजामिन मॅनेंटी, जसप्रीत सिंह, जे. जे. स्मट्स, ग्रांट स्टुअर्ट, थॉमस ड्रेका.





