Rupali Patil Thombare | भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या मृत्यू प्रकरणात गर्जे कुटुंबावर गौरी यांच्या कुटुंबीयांकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर अनंत गर्जे पोलिसांना शरण आला आणि त्याला अटक केली. त्यानंतर गर्जेचे मूळ गाव मोहोज देवढे येथे त्याच्या घरासमोरच गौरी यांच्या पार्थिवावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. याप्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरुन अनंत गर्जे प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. रुपाली पाटील यांची पोस्ट “अशा घटना अत्यंत दुर्दैवीच असतात. डॉ गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहिला. श्रीमंताला पोरी देऊ नका असे म्हणत ओक्साबोक्शी रडत होते, एक बाप हतबल होता. पण घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे.” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे “डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे. एक घर एक महिला उभे करू शकते तसेच ती महिला जर एखाद्याचे घर संपवण्याचे कारण बनू शकते, अशा बेकायदेशीर संबंध कृत्य करणाऱ्या, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे. त्याशिवाय कुटुंब वाचणार नाहीत, कुटुंब सुरक्षित राहणार नाहीत आणि अनैतिक संबंध करण्याचे धाडस करणार नाही. यामुळे कुटुंब वाचतील.” असं परखड मत रुपाली पाटलांनी मांडलं आहे. Rupali Patil Thombare | “पत्नी तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत म्हणून आत्महत्या करते तेव्हा नवऱ्यावर त्याच्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल होतो पण खरी जी गुन्हेगार आहे अनैतिक संबंध ठेवणारी महिला मोकाट राहता कामा नये. बाकी यावर सविस्तर बोललेच. अजून एक जाता जाता कितीही संकटं, भांडणं झाली तरी आत्महत्या पर्याय नाही. त्यामुळे आत्महत्या कोणीही करूच नये” हेही रुपाली पाटील यांनी अधोरेखित केलं आहे. Rupali Patil Thombare | गर्जेला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दरम्यान, या प्रकरणात डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या वकिलांनी आरोपी अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. या मागणीला विरोध अनंत गर्जे यांच्या वकिलांनी करत प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पालवे यांच्या कुटुंबीयांनी गर्जे कुटुंबावर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोणती माहिती पुढे येते हे पाहावे लागणार आहे. Rupali Patil Thombare | हेही वाचा: इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख भारतात पोहोचली ; अनेक उड्डाणे रद्द, परिसरात विषारी वायू