“सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेले होते?” गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल

Anjali Damania Vs Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आई-वडिलांकडून ही हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांच्यासह सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळेच गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या व्यक्तींनी केला.
याप्रकरणी अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील डॉ. गौरी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याप्रकरणी दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Anjali Damania Vs Pankaja Munde |
अंजली दमानिया यांची पोस्ट
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण पुत्रसमान पीएच्या मदतीला का गेला नाहीत? असा प्रश्न त्यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे. “पंकजा मुंडे यांचे कालचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला. संध्याकाळी ६.३० ते ६.४५ पीए अनंतचा फोन, दुसऱ्या पीएच्या फोन वर आला, तो खूप रडत होता, पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्यांनी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही घटना स्थळी का गेला नाहीत, तुम्हाला जमत नव्हते, तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हते? तुमच्या कार्यालयाने हे पोलिसांना कळविले का? Anjali Damania Vs Pankaja Munde |
सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेले होते?
पुत्रसमान पीएच्या तत्काळ मदतीला का गेला नाहीत? तुमचा पुत्रसमान पीए नायर हॉस्पिटल मधून गायब का झाला? जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही व्यक्ती का हजार नव्हते? आई वडील तरी ३.३० ला बी हून मुंबईला पोहोचले, पण पोलिसांनी सकाळी ७ वाजेपर्यंत तक्रार का घेतली नाही? आपण पोलिस स्टेशनला येऊन, नायर हॉस्पिटलला येऊन, परिवाराची मदत का केली नाही? पुत्रसमान होता ना अनंत? सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेले होते ह्याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का? सीसीटीव्ह फुटेजची मागणी करणार का?, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, काल दुपारपर्यंत तुम्ही ह्यावर काहीच का बोलला नाही? त्याच्या लग्नात उपस्थित राहून ट्वीट केलेत, मग पत्नीचा मृत्यू झाल्यावर संध्याकाळी ६.४५ पासून काहीच का बोलला नाहीत? त्या पालवे कुटुंबाला तुमची मदत का झाली नाही हे स्पष्ट करावे ही विनंती. मला ह्यात राजकारण आणायचं नव्हत्ते, पण, मी माध्यमांशी बोलताना, तुम्ही फोन न केल्याच्या उल्लेखनानंर तुम्ही वडिलांशी बोललात त्याबद्दल धन्यवाद,” असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांचे कालचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला
संध्याकाळी ६.३० ते ६.४५ पीए अनंत चा फोन, दुसऱ्या पीए च्या फोन वर आला, तो खूप रडत होता, पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्यांनी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही पुढे काय केलं ?
तुम्ही घटना स्थळी का गेला नाहीत, तुम्हाला… pic.twitter.com/jOfsYq4mrH
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 24, 2025
पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने निवेदनात नेमकं काय म्हंटले?
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने काल एक निवेदन प्रसिद्ध करत शनिवारचा घटनाक्रम सांगितला होता. “काल दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला होता. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती, असे पंकजा मुंडेंच्या कार्यालयाने म्हटले आहे. Anjali Damania Vs Pankaja Munde |
पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलीसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले. ते प्रचंड दु:खात आहेत, हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या वैयक्तिक जीवनात काय चालू असतं, हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. Anjali Damania Vs Pankaja Munde |
दरम्यान, अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते. काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक अनंत गर्जे यांच्या वरळीतील घरी रवाना झाले आहे.
हेही वाचा:





