Wagholi Crime | फेसबुक जाहिरातीतून सायबर सापळा; वाघोलीतील तरुणाला लाखोंचा तोटा

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – शेअर मार्केट गुंतवणुकीवर फायद्याच्या आमिषाने वाघोली येथील 37 वर्षीय व्यक्तीला 8 लाख 29 हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघोलीतील चोखी ढाणी परिसरातील 37 वर्षीय व्यक्तीला फेसबुकवर जाहिरात दिसली त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादीला फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 10 टक्के फायदा एका दिवसाला भेटतील, असे आमिष दिले. व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून लिंक पाठविण्यात आली. त्यावर आयपीओ खरेदी करण्यास सांगून फिर्यादीने 8 लाख 29 हजार गुंतवले. त्याचे 12 लाख रुपये झाल्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी पैसे भरण्यास सांगितले. भरलेले पैसे परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात कळवून वाघोली पोलिसात फिर्याद दिली.





