गौरी गर्जे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अनंतच्या शरीरावरही आढळल्या जखमा: ‘तो’ संशय बळावला, कोर्टात काय घडलं?

Dr. Gauri Garje Death Case : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॅा. गौरी गर्जे पालवे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी पती अनंत गर्जेला पोलिसांना अटक केली आहे. कोर्टाने अनंतला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्याची पोलीस कोठडी संपली असून, कोर्टात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी या प्रकरणी माहिती सादर केल्यानंतर आरोपी अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत २ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अनंत गर्जेच्या अटकेनंतर गौरी यांच्या कुटुंबीयांनी गर्जे कुटुंबावर गंभीर आरोप करत तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. आता या प्रकरणात नवीनवी माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांचे अफेअर होते. या कारणामुळे सातत्याने वाद होत असल्याने गौरी यांनी वरळी येथील राहत्या घरी गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. मात्र, आता पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
‘तो’ संशय बळावला
नेमकं काय घडलं?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी गौरी यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





