आश्रम उघडला आहे का? शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून केतकी चितळे भडकली; पोस्ट चर्चेत !

Ketaki Chitale । Bangladesh Violence | Sheikh Hasina: अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या राजकारणी नेत्याशी पंगा घेते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर केली असून, त्यामुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे.
झालं असं की केतकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बांगला देशातील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीचं परखड मत मांडले आहे.
आता बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाबाबत तिने मत व्यक्त केले आहे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. शेख हसीना यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्रयाबाबत नाराजी व्यक्त केली.
अभिनेत्री केतकी चितळे नेमकी काय म्हणाली?
१. लंडनने आश्रय देण्यास नकार दिला, शेख हसीना इथेच येतात.
२.म्यानमार मधील रोहिंग्यांना ५२ मुस्लिम देश दिसत नाहीत, मेले इथेच येतात कडमडायला.
३. बांग्लादेशींना पाकिस्तान इतका जवळचा वाटतो तिथे जात नाहीत. आठवडा बाजारात चायला रजई १०० रुपये टाकाने विकणार इथेच !
जवळपास आपण धर्मशाळा, ओह सॉरी धर्म नाही कारण धर्म म्हंटले कि, हे सो-कॉल्ड भारतीय ‘सो कॉल्ड अल्पसंख्याक मुसलमान’ समाज जो बिचारा भीतीच्या छत्रछायेखाली असतो नाही का; त्यामुळे धर्म नाही. आश्रम उघडला आहे का आपण?’ या आशयाची पोस्ट केतकीने केली आहे.
बांगलादेशात भारतीय सांस्कृतिक केंद्रावर हल्ला:
बांगलादेशात भारतीय सांस्कृतिक केंद्रावर जमावाने हल्ला केला आणि या केंद्राची तोडफोड केली. या शिवाय देशभरातील चार हिंदू मंदिरांचेही किरकोळ नुकसान करण्यात आले. बांगलादेशातील हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते काजोल देबनाथ यांनी ही माहीती दिली.
ढाक्याच्या धानमंडी भागात असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे अनियंत्रित जमावाने नुकसान केले. मार्च २०१० मध्ये औपचारिकपणे उद्घाटन झालेल्या केंद्राद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या जात असत.
या कार्यक्रमात योग, हिंदी, भारतीय शास्त्रीय गायन संगीत, कथ्थक, मणिपुरी आणि भारतीय नृत्यांसाठी भारतातील मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांच्या सहभागाने भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन दिले जात असायचे. या केंद्रातील ग्रंथालयात भारतीय कलांविषयी २१ हजार पुस्तके आहेत.
आंदोलकांनी ढाकामधील बंगबंधू स्मारक संग्रहालय म्हणूनही ओळखले जाणाऱ्या बंगबंधू भवनासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आग लावल्या. हे संग्रहालय हसिना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांना समर्पित होते. रहमान यांची १९७५ मध्ये अध्यक्ष असताना हत्या झाली होती.
हे देखील नक्की वाचा….






