Irfan Pathan : ‘…म्हणून तो कुत्र्यासारखा भुंकतोय’, इरफानने गरळ ओकणाऱ्या आफ्रिदीची केली होती बोलंती बंद, पाहा VIDEO

Irfan Pathan on Shahid Afridi : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आयपीएल समालोचनातून बाहेर काढले जाणे आणि पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीसोबतच्या वादाच्या घटनेबद्दल खुलासे केले. त्याने २००६ मधील विमान प्रवासात आफ्रिदीशी झालेल्या वादाचा खुलासा केला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
विमानातील वादाचा किस्सा चर्चेत –
विशेषतः पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीसोबतच्या त्याच्या भांडणाच्या किस्स्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इरफानने २००६ मधील एका घटनेचा उल्लेख केला, जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी संघ कराची ते लाहोर या विमानाने एकत्र प्रवास करत होते. इरफानने सांगितले, “प्रवासादरम्यान शाहिद आफ्रिदीने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझे केस विस्कटत विचारले, ‘कैसे हो बच्चे?’ यावर मी त्याला प्रत्युत्तर दिले, ‘तू कधीपासून माझा बाप झालास?’”
View this post on Instagram
यानंतर इरफानने आणखी एक मजेदार किस्सा सांगितला. इरफान म्हणाला, “मी अब्दुल रझाककला विचारले, इथे कोणत्या प्रकारचे मांस मिळते? त्याने मला विविध प्रकारच्या मांसाबद्दल सांगितले. मी पुन्हा विचारले, ‘कुत्र्याचे मांस मिळते का?’ यावर रझाक चकित झाला आणि म्हणाला, ‘इरफान, तू असं का बोलतोयस?’ तेव्हा मी म्हणालो, ‘आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले आहे वाटतं, म्हणून खूप वेळ झालं भुंकतोय.’ यानंतर आफ्रिदी अपमानित झाला आणि पुढे काहीच बोलू शकला नाही.”
हेही वाचा – Irfan Pathan : “तू कब से बाप बन गया?”, गैरवर्तन करणाऱ्या आफ्रिदीला इरफान पठाणने सर्वांसमोर लगावली होती चपराक
सोशल मीडियावर चर्चा –
जब फ्लाइट में किसी बात को लेकर शाहिद अफरीदी पर गुस्साए इरफान पठान ने बुरा सुना दिया. पूरा मामला क्या था?
पूरी बातचीत- https://t.co/yqVR25vYSG@saurabhtop @IrfanPathan #GITN #Interview #IrfanPathan #ShahidAfridi pic.twitter.com/HMuE0pCPCo
— The Lallantop (@TheLallantop) August 16, 2025
इरफानच्या या मुलाखतीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते त्याच्या या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी, त्याने सांगितलेल्या किस्स्यांमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. इरफान पठाणची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याच्या कारकिर्दीतील या खुलाशांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा – Irfan Pathan : रोहित शर्मामुळे इरफान पठाण आयपीएलच्या कॉमेंट्रीतून बाहेर पडला ? स्वतः केला खुलासा म्हणाला…
पाकिस्तानविरुद्ध इरफानचे राहिलयं वर्चस्व –
इरफान पठानचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने शाहिद आफ्रिदीला एकूण ११ वेळा बाद केले आहे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना त्याने ८०७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शानदार शतकाचाही समावेश आहे. गोलंदाजीमध्ये त्याने ६७ पाकिस्तानी फलंदाजांना बाद केले आहे. मैदानावरील या कामगिरीमुळे इरफान नेहमीच पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवणारा खेळाडू राहिला आहे.





