Iran helicopter crash : इराणचे अध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

Iran helicopter crash – इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी याना घेऊन जाणारे हेलिप्टर आज अत्यंत विपरीत परिस्थितीत कसेबसे उतरवले गेले. हेलिकॉप्टर जवळ जवळ दुर्घटनाग्र्सत झाले होते. इराणच्या वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले मात्र या घटनेचा कोणताही तपशील या वृत्तामध्ये देण्यात आला नाही.
रायसी इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात जात होते, त्यावेळी ही घटना घडली. हे ठिकाण इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ आहे. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत एका धरणाचे उद्घाटन करण्यासाठी रायसी रविवारी पहाटे अझरबैजानमध्ये गेले होते. आरस नदीवर दोन्ही देशांनी मिळून बांधलेल्या तीन धरणांपैकी हे तिसरे धरण आहे.
इराणमध्ये विविध प्रकारची हेलिकॉप्टर वापरली जातात. परंतु आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांचे सुटे भाग मिळणे कठीण होते. त्याचा लष्करी विमाने देखील १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वीची आहेत.
कट्टरवादी रायसी हे इराणचे अध्यक्ष आणि इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख देखील आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ८५ वर्षीय खामेनी यांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांनी पदत्याग केल्यानंतर त्यांची जागा रायसी घेऊ शकतात, असा अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला आहे.





