US Helicopter Crash। अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील हंटिंग्टन बीचवर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. याठिकाणी एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात पाच जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे, ज्यात हेलिकॉप्टरमधील दोन प्रवासी आणि रस्त्यावर असलेले तीन जण यांचा समावेश आहे. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पोलिस विभागाच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, हंटिंग्टन बीच पोलिस विभाग आणि हंटिंग्टन बीच अग्निशमन विभागाने शनिवारी पॅसिफिक कोस्ट हायवे आणि हंटिंग्टन स्ट्रीटवर झालेल्या अपघाताला प्रतिसाद दिला. पोलिसांनी सांगितले की हेलिकॉप्टरमधून दोन जण बाहेर पडले आणि रस्त्यावर तीन जण जखमी झाले. US Helicopter Crash। पोलिस विभागाने सांगितले की शनिवारी दुपारी हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर कोसळले. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊ लागले, झाडांना धडकले आणि पॅसिफिक कोस्ट हायवे (PCH) वर कोसळले. या अपघातात किमान पाच जण जखमी झाले, ज्यात हेलिकॉप्टरमधील दोन प्रवासी आणि जमिनीवर असलेले तीन जण यांचा समावेश आहे. सर्व जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तसेच, या अपघातात एक व्यक्ती थोडक्यात बचावली, ज्याचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. US Helicopter Crash।