राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टरच्या अपघातातून थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Haribhau Bagade | राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छोटा स्फोट झाला. पाली येथून उड्डाण करताच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये स्फोट झाला आणि मागच्या भागातून धूर येऊ लागला. सुदैवाने, हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
राजस्थानमधील पाली येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राज्यपाल जयपूरला परतत होते. हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच त्यातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच हेलिकॉप्टर तत्काळ खाली उतरवले गेले आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
तांत्रिक बिघाडामुळे अपघात
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. ही घटना राज्यपालांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक मानली जात आहे. सध्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरच्या मागील भागातून धूर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. Haribhau Bagade |
राजस्थान के पाली में राज्यपाल श्री @BagadeHaribhau जी की सुरक्षा में भारी चूक, उड़ान भरते वक्त हेलिकॉप्टर में हुआ धमाका, हेलीकॉप्टर से अचानक उठने लगा धुआं |
सब सुरक्षित हैं |@RajBhavanJaipur pic.twitter.com/sWzwLjMo21
— 𝗗𝗿. 𝗦𝗮𝗷𝗷𝗮𝗻 𝗞𝘂𝗺𝗮𝗿 𝗦𝗮𝗶𝗻𝗶 (@DrSajjanSaini) March 29, 2025
हेलिकॉप्टर खाली उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले. त्याचबरोबर हेलिकॉप्टरमध्ये स्फोट आणि धूर निघत असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी नियमितपणे तपासले जात होते की नाही, तसेच सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले की नाही हेही पाहिले जाणार आहे. Haribhau Bagade |
हेही वाचा:
‘अलविदा, जंक फूड’! ‘या’ देशात पिझ्झा, बर्गरसह जंक फूडवर बंदी ; सरकारने का दिला मोठा आदेश?




