GT vs RR Qualifier 2 : शुबमन गिलच्या शतकासह गुजरातचा ऐतिहासिक विजय! राजस्थानचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा फायलमध्ये दाखल
GT vs RR Qualifier 2 : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने ५ सीजनमध्ये तब्बल तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.

GT vs RR Qualifier 2 Gujarat Titans Enters Final : आयपीएल २०२६ च्या ‘क्वालिफायर-२’ मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने ५ सीजनमध्ये तब्बल तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात गुजरातचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे.
गुजरातचा राजस्थानवर एकतर्फी विजय –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर ६ बाद २१४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलने ठोकलेल्या १०३ धावांच्या झंझावाती शतकामुळे गुजरातने हा विजय मिळवला. गिलच्या या शतकी खेळीने राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीच्या ९६ धावांच्या खेळीला फिके पाडले आणि राजस्थानच्या यंदाच्या प्रवासाचा शेवट केला.
A 𝙩𝙞𝙩𝙖𝙣𝙞𝙘 𝙧𝙪𝙣 to the #Final 💙@gujarat_titans make their way into the #TATAIPL 2026 finale 👏
Updates ▶️ https://t.co/eupS8cBPc2#Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/EeKpvawv9O
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर वैभव सूर्यवंशीने सांभाळली खिंड!
Innings Break!
Another #RR charge, led by Vaibhav Sooryavanshi 💪
Will #GT chase down the 🎯 to enter the Final? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/3ieBSBINoP
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
न्यू चंदीगडच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने टॉस गमावूनही २०० पेक्षा जास्त धावा करत एलिमिनेटर सामना जिंकला होता. यावेळी राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पहिल्या २ ओव्हर्समध्येच संघाने यशस्वी जैस्वाल आणि स्वतः रियान परागच्या विकेट्स गमावल्या. संघ प्रचंड दडपणाखाली असताना १५ वर्षीय वंडर बॉय वैभव सूर्यवंशीने अनुभवी रवींद्र जडेजाच्या सोबतीने डाव सावरला. वैभव यावेळी आपल्या नेहमीच्या स्फोटक अवतारात दिसला नाही, तरीही त्याचे रन्स इतर फलंदाजांपेक्षा वेगाने येत होते.
वैभवचे सलग दुसऱ्यांदा हुकले शतक –
वैभव सूर्यवंशीने या हंगामातील आपले ५ वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दुर्दैवाने सलग दुसऱ्या सामन्यात तो शतकाच्या अगदी जवळ येऊन बाद झाला. कगिसो रबाडाच्या चेंडूवर थर्ड मॅनला कॅच देऊन वैभव ४७ चेंडूंत ९६ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये डॉनोवन फरेराने राशिद खानला ४ गगनभेदी षटकार ठोकले. फरेराने अवघ्या ११ चेंडूंत नाबाद ३८ धावांची तुफानी खेळी केल्यामुळे राजस्थानने २० षटकांत २१४ धावांचा डोंगर उभारला. गुजरातकडून जेसन होल्डर आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
राजस्थानची एक चूक अन् गुजरातचा ऐतिहासिक विजय –
Under immense pressure, the Captain says 𝙆𝙚𝙚𝙥 𝘾𝙖𝙡𝙢
🧘♂️🎥 The moment Shubman Gill got to a masterful ton 👏
Updates ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR | @gujarat_titans pic.twitter.com/q3TaZru8Vj
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
राजस्थान रॉयल्सनेकेलेली एक चूक त्यांच्या फायनलच्या तिकिटावर पाणी फेरून गेली. गुजरात टायटन्सने यापूर्वी आयपीएलमध्ये कधीही २१० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. मात्र, सलामीवीर साई सुदर्शन अवघ्या १४ धावांवर असताना डोनोवन फरेराने त्याचा कॅच सोडला आणि हीच चूक राजस्थानला भारी पडली.यानंतर सुदर्शन (२६ चेंडूंत ५८ धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (३० चेंडूंत अर्धशतक) यांनी मिळून १३ ओव्हर्समध्ये १६७ धावांची शतकीय भागीदारी रचली. सुदर्शन बाद झाल्यावरही गिलने प्ले-ऑफमधील आपले दुसरे शानदार शतक ठोकले आणि ५३ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली. अखेर जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी १८.४ ओव्हर्समध्येच गुजरातला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.





