Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम! आयपीएलच्या इतिहासात ‘हा’ कारनामा करणारा पहिलाच अनकॅप्ड खेळाडू
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने आठ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ४७ चेंडूंमध्ये ९६ धावा करून तो बाद झाला. यानंतर फरेराच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने गुजरातसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Vaibhav Sooryavanshi record 700 Runs IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ‘क्वालिफायर-२’ सारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनेपुन्हा एकदा क्रिकेट जगताला थक्क केले आहे. न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्था संघाची सुरुवात खराब झाली असली, तरी सलामीवीर वैभव सूर्यवंशीने एका बाजूने खिंड लढवली. या सामन्यात त्याने वैयक्तिक २० धावांचा आकडा पार करताच आयपीएलच्या इतिहासात आजवर एकाही ‘अनकॅप्ड’ (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला) खेळाडूला न जमलेला एक अद्भूत पराक्रम करून दाखवला आहे.
७०० धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच ‘अनकॅप्ड’ किंग!
आयपीएलच्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजवर कोणत्याही खेळाडूने एकाच हंगामात एवढे विक्रम मोडले नसतील, जेवढे या १५ वर्षांच्या बिहारच्या मुलाने एकाच हंगामात मोडीत काढले आहेत. एका आयपीएल हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वैभवने आधीच आपल्या नावावर केला होता. मात्र, आता त्याने पुढे जात एकाच हंगामात ७०० हून अधिक धावा बनवणारा आयपीएल इतिहासातील पहिला ‘अनकॅप्ड खेळाडू’ बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
Pure class from BOSS BABY Vaibhav Sooryavanshi!💥
ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL 2026, Qualifier 2 👉 #GTvsRR | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ. pic.twitter.com/XkQ7eMfRO9
— Star Sports Kannada (@StarSportsKan) May 29, 2026
भारतीय खेळाडूंचा विचार केला, तर आयपीएलच्या एका हंगामात ७०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा वैभव हा भारताचा केवळ ५ वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून विराट कोहलीने दोनदा, तर साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी १-१ वेळा हा टप्पा ओलांडला आहे.
पॉवरप्लेमध्ये ५०० पेक्षा धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज!
वैभवच्या फलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो सुरुवातीपासूनच चौके-छक्क्यांची बरसात करतो. एका आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आधीच आपल्या नावावर केला होता. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या ६ षटकांत ३१ धावा कुटून त्याने आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. आता वैभव आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. चालू आयपीएल २०२६ च्या हंगामात वैभवच्या बॅटमधून एकट्या पॉवरप्लेमध्ये तब्बल ५२१ धावा निघाल्या आहेत.





