IPL 2026 Prize Money : यंदा IPLच्या विजेत्याला किती कोटी मिळणार? फायनलपूर्वी प्राइज मनीचे सर्व आकडे आले समोर; पाहा संपूर्ण यादी
IPL 2026 Prize Money : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याच्या बक्षीस रकमेत काही बदल झाला आहे का? २००८ पासून बक्षीस रकमेत किती वेळा आणि किती प्रमाणात वाढ झाली आहे? जाणून घेऊया.

IPL 2026 Prize Money Breakdown : आयपीएल २०२६ चा महाअंतिम सामना आज म्हणजेच रविवारी, ३१ मे रोजी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांमध्ये यंदाच्या आयपीएलच्या बक्षीस रकमेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २००८ पासून या लीगच्या प्राइज मनीमध्ये किती वेळा बदल झाला आणि उपविजेत्यासह इतर संघांना किती कोटी मिळतात, याचे सर्व रंजक आकडे समोर आले आहेत.
विजेत्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल २०२६ च्या प्राइज मनीबाबत अद्याप कोणताही नवीन बदल जाहीर केलेला नाही. गेल्या हंगामापर्यंत आयपीएलचे एकूण प्राइज पूल सुमारे ४६.५ कोटी रुपयांचे होते. यानुसार, यंदाही विजेत्या (चॅम्पियन) संघाला तब्बल २० कोटी रुपयांचे बंपर इनाम मिळण्याची शक्यता आहे, तर उपविजेत्या (रनरअप) संघाला १२.५ ते १३ कोटी रुपये मिळतील.
२००८ ते २०२६: प्राइज मनीचा रंजक इतिहास –
आयपीएलच्या इतिहासात बक्षीस रकमेत आतापर्यंत तीन वेळा मोठे बदल करण्यात आले आहेत:
- २००८ (पहिली आवृत्ती): आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये चॅम्पियन संघाला अवघे ४.८ कोटी आणि उपविजेत्याला २.४ कोटी रुपये मिळाले होते.
- २०१० (पहिला बदल): बीसीसीआयने २०१० मध्ये विजेत्याची रक्कम थेट १० कोटी, तर उपविजेत्याची रक्कम ५ कोटी रुपये केली.
- २०१४ (दुसरा बदल): लीगचा वाढता क्रेझ पाहून विजेत्या संघाचे इनाम १५ कोटी आणि उपविजेत्याचे १० कोटी रुपये करण्यात आले.
- २०१६ (अंतिम बदल): २०१६ मध्ये शेवटचा बदल झाला. तेव्हापासून गेल्या १० वर्षांत विजेत्याला २० कोटी आणि रनरअपला १२.५ ते १३ कोटी रुपये दिले जातात.
प्लेऑफमधील संघ आणि वैयक्तिक पुरस्कारांची यादी –
🚨PRIZE MONEY AND AWARDS OF IPL 2026🚨
Champions – 20cr
Runners up – 13.5cr
3rd Place (Qualifier 2 loser) – 7cr
4th Place (Eliminator loser) – 6.5cr
Fair Play Award – 10lakh
Most Valuable Player – 15lakh
Orange Cap – 10lakh
Purple Cap – 10lakh
Emerging Player of the season -… pic.twitter.com/xhbdKavV8W— Akshat (@Akshatgoel1408) May 31, 2026
विजेत्या आणि उपविजेत्या संघांव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या इतर दोन संघांनाही कोट्यवधींचे बक्षीस मिळते. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरील संघाला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला ६.५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीसाठी खालीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे दिली जातात:
- इमर्जिंग प्लेयर: ₹२० लाख
- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP): ₹१५ लाख
- ऑरेंज कॅप विनर: ₹१० लाख
- पर्पल कॅप विनर: ₹१० लाख
- सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन: ₹१० लाख
- फेअरप्ले अवॉर्ड: ₹१० लाख





